‘व्‍हॅलेंटाइन डे’ला केला गुपचूप विवाह; पाच महिन्‍यातच संपला संसार

‘व्‍हॅलेंटाइन डे’ला केला गुपचूप विवाह; पाच महिन्‍यातच संपला संसार
marriage
marriage

जळगाव : रतलाम (मध्य प्रदेश) येथे मामाच्या घराशेजारी राहणाऱ्या मुलीशी जळगावच्या तरुणाचे प्रेमसंबध जुळले. ‘बचपन की मोहब्बत म्हणत’ कुटुंबीयांना न सांगताच दोघांनी ‘व्हॅलेंटाइन-डे’ला गुपचूप लग्न करून घेतले. डॉक्टर मुलीच्या कुटुंबास ते मान्य झाले नाही. बळाच्या जोरावर दोघांना विभक्त करून मुलीला गायब केले. मुलासह कुटुंबास ठार मारण्याची धमकी दिली. परिणामी, मुलाने विष घेऊन आत्महत्या केली. (jalgaon-news-valentine-day-love-marraige-but-five-month-life-and-boy-suicide)

येथील शिवाजीनगरमधील चिराग पांडे (वय २८) लहानपणापासून मामा हेमंत पुरोहित यांच्या घरी रतलाम (मध्य प्रदेश) येथे राहत होता. तिथे शेजारी राहणाऱ्या आर्चीशी (काल्पनिक नाव) मैत्रीतून प्रेमात रूपांतर झाले. दोघांचे समाज वेगळे. त्यात मुलगी डॉक्टर असल्याने विरोध ठरलेलाच होता, म्हणून देाघांनी ‘व्हॅलेंटाइन-डे’स (१४ फेब्रुवारी २०२१) गुपचूप नोंदणी विवाह करून घेतला.

कुटुंबीयांची काढली समजूत

नंतर आपापल्या घरी राहत होते. वेळ बघून दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्नही केला. अखेर दोघे पळून जाण्याच्या तयारीत असताना, चिरागच्या कुटुंबीयांनी शेवटचा प्रयत्न म्हणून मुलीच्या कुटुंबीयांना मागणी घातली आणि इथेच बिनसलं. मुलीच्या कुटुंबीयाचे पित्त खवळल्याने त्यांनी वेगळा मार्ग अवलंबून मुलाचा काटा काढायचे ठरवले.

जगणेच केले मुश्कील

दोघांनी विपरीत निर्णय घेऊ नये म्हणून शनिवारी (ता. १०) चिरागचे मामा हेमंत पुरोहित, आई अनिता, मावशी यांनी मुलीच्या घरी जाऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही अपमानीत व्हावे लागले. रविवारी (ता. ११) मुलीचे वडील विजय राठोड, काका भरत राठोड, भाऊ अंश राठोड, विशाल राठोड व भावाचे मित्र अशोक तिवारी, आशिष शिवरे अशांनी चिरागच्या मामाच्या घरात येऊन ठार मारण्याची धमकी दिली.

marriage
मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस; घरांवरील पत्रे उडाली

शेवटचे बोलणे बहिणीसोबत

मुलीकडच्या धमकीमुळे पांडे कुटुंबीय प्रचंड दहशतीत होते. मुलाची काळजी वाटत असल्याने त्यांनी तत्काळ चिरागला जळगावला पाठविले. सोमवारी (ता. १२) पहाटे चारला तो रतलाम येथून जळगावात आला. ‘आपण निघून आलो’, ‘पत्नीचे त्यांनी काही बरेवाईट करून टाकले’, ‘पुन्हा परत गेलो तर भानगडी’, अशा विचारात चिरागने विष घेत शेवटचा फोन बहिणीला (पायल) केला. बोलण्यावरून शंका आल्याने तिने मावसभाऊ निर्मल याला लगेच घरी पाठवले. घराचे दार आतून बंद होते. निर्मलने दार तोडले, तर आत चिराग जमिनीवर कोसळलेला होता. जवळ विषाची बाटली बघून त्याने तत्काळ चिरागला घेत जिल्‍हा रुग्णालय गाठले. तेथून खासगी रुग्णालयात त्याला हलवले. मात्र, उपचार सुरू असताना, मंगळवारी (ता. १३) दुपारी साडेबाराला त्याचा मृत्यू झाला.

मुलीच्या कुटुंबीयांवर आरोप

चिरागच्या मृत्यूला मुलीचे वडील विजय राठोड, काका भरत राठोड, भाऊ अंश राठोड, विशाल राठोड व भावाचे मित्र अशोक तिवारी, आशिष शिवरे हेच जबाबदार असून, त्यांनी आमच्या घरी येऊन धमकावले. ठार मारण्याची धमकी दिल्यानेच चिरागने टोकाचा निर्णय घेतल्याचे शहर पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी आलेल्या चिरागचे मामा हेमंत पुरोहित, मावसभाऊ निर्मल तिवारी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com