आमदार चंद्रकांत पाटलांसह सत्‍ताधारी शिवसेनेचे जलसमाधी आंदोलन

आमदार चंद्रकांत पाटलांसह सत्‍ताधारी शिवसेनेचे जलसमाधी आंदोलन
Chandrakant patil shiv sena
Chandrakant patil shiv sena

मुक्ताईनगर (जळगाव) : ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात आले नाही. विशेष म्‍हणजे सत्‍ताधारी असलेल्‍या शिवसेनेच्‍या आमदारांनी केलेल्‍या मागणीची दखल घेतली न गेल्‍याने आमदार चंद्रकांत पाटील यांच्‍यासह शिवसेनेकडून धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. (jalgaon-news-varangaon-ozarkheda-dam-Jalasamadhi-agitation-of-ruling-Shiv-Sena-with-MLA-Chandrakant-Patil)

पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेअंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार गेल्या महिनाभरापुर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा होत पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व पंप दुरुस्तीसाठी तात्काळ कार्यकारी संचालक यांचेशी चर्चा करून निधी उपलब्ध करून दिला होता.

तरीही दखल नाही

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितल्‍यानंतर देखील जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी याबाबत आजतागायत तातडी दाखविलेली नाही. दरम्यानच्या काळात मुबलक पुरस्थिती हतनूर धरणाला सुरू होती. अशा परिस्थितीत पाणी ओझरखेडा धरणात फुल झाले असते. परंतु निव्वळ हलगर्जीपणा संबंधित अधिकाऱ्यांनी केल्‍यामुळे सदरील धरण कोरडे ठाक होण्याच्या मार्गावर असून या पाणलोट क्षेत्रातील हजारो हेक्टर शेत जमिनीतील केळीसह इतर पिके संकटात सापडली आहे.

Chandrakant patil shiv sena
पिक वाचविण्यासाठी पिकांना डब्या डब्याने पाणी

जलसंपदा मंत्रींनाही दिले होते निवेदन

या प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ११ ऑगस्‍टला मुंबई येथे व जिल्हाधिकारी डॉ. राऊत यांना १० ऑगस्‍टला ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडणे व संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई वसूल करावी; अशा मागणीचे निवेदन दिले होते. परंतु आद्यपपावेतो कुठलीही कारवाई न झाल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व हजारो शेतकरी थेट ओझरखेडा धरण येथे आज जलसमाधी आंदोलन केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com