ग्रामस्‍थांनी पाठलाग करून पकडला नऊ लाखांचा गुटखा

ग्रामस्‍थांनी पाठलाग करून पकडला नऊ लाखांचा गुटखा
Jalgaon News
Jalgaon NewsSaam Tv

वाकोद (जळगाव) : जळगाव-औरंगाबाद महामार्गावर २ जुलैला सायंकाळी वाकोद ग्रामस्थांनी पाठलाग करून लाखो रुपयांचा गुटखा वाहून नेणारा टेम्पो पकडला. मात्र, पहूर पोलिसांनी (Police) या प्रकरणात तब्बल २४ तासानंतर बुधवारी वाहनचालक व मालकावर गुन्हा दाखल केला असून, वाहनातून ९ लाख ६० हजारांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. तसेच मुद्देमालासह वाहनही ताब्यात घेतले आहे. (Jalgaon News Police Action)

Jalgaon News
Illegal Moneylenders: दोन लाखांच्या मुद्दलावर 32 लाख व्याजाची वसुली; खासगी सावकारावर गुन्हा दाखल

जळगाव (Jalgaon) - औरंगाबाद (Aurangabad) महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान २ जुलैला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पिंपळगाव- पळसखेडा फाट्याजवळ जळगाव वाहतूक पोलिसांनी बोलेरो पीकअप वाहन (एमएच १९, सीवाय ६८८१) अडवून चौकशी केली असता चालकाची वागणूक संशयास्पद आढळून आली. वाहनात काय माल आहे? असे विचारताच वाहन चालकाने तेथून धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पाठलाग करत वाहतूक पोलिसही मागे वाहन घेऊन निघाले. बेदरकारपणे दोघांनी वाहने भररस्त्यावर चलविल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

पोलिसही म्‍हणाले चटई आहे

टेम्पो चालकाने यू -टर्न घेऊन महामार्गावर वाहन लावून शेतातून मार्ग काढीत पळ काढला. सुरवातीला वाहतूक पोलिसांनी त्यात चटई असल्याचे पत्रकारांना सांगितले. त्यानंतर पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी हजर झाले असता जागेवर पंचनामा करा, अशी मागणी करून देखील त्यांनी वाहन पोलिस ठाण्यात न्यावे लागेल, असे सांगितले. यामुळे यात नेमके काय शिजत आहे? अशी सर्वांना शंका होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com