चाळीसगावला पुन्हा सावधानतेचा इशारा; नदीच्‍या पुरामुळे वेढा
Chalisgaon Rain

चाळीसगावला पुन्हा सावधानतेचा इशारा; नदीच्‍या पुरामुळे वेढा

चाळीसगावला पुन्हा सावधानतेचा इशारा; नदीच्‍या पुरामुळे वेढा

चाळीसगाव (जळगाव) : गेल्‍या आठवड्यात चाळीसगाव तालुका परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने गाव पाण्यात बुडाले होते. या परिस्थितीतून सावरत असताना दोन दिवसांपासून होत असलेल्‍या पावसामुळे पाण्याची पातळी वाढत असल्‍याने चाळीसगावला पुन्‍हा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (jalgaon-news-Warning-to-Chalisgaon-again-Surrounded-by-river-floods)

चाळीसगाव तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच धरणे ओसंडून वाहत आहेत. चितेगाव आणि उंबर ओहळ धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर निघत आहे. तसेच डोंगर भागात देखील पाऊस सुरू असल्याने तितुर व डोंगरी या दोन्ही नद्यांना पाणी वाढत आहे. तरी नदी काठावरील नागरिकांनी दक्ष राहावे, पुलावरून पाणी वाहत असल्यास पाण्यातून गाडी टाकू नये अथवा जाण्याच्या प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Chalisgaon Rain
लगबग उत्सवाची; बाप्पाच्या गजरात काेकणवासीय परतू लागले गावी

तितुर, डोंगरी नदीचे वाढतेय पाणी

शहरातून वाहणाऱ्या तितुर व डोंगरी नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुलावरून पाणी जाण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डोंगरी नदीकाठी असलेल्या बांबूचे बाबांच्या दर्गा परिसरात पुन्हा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. एकूणच ही सर्व परिस्थिती लक्षात घेता, आमदार मंगेश चव्हाण यांनी कोणाला काही अडचण असल्यास किंवा कुणी कुठेही अडकले असल्यास 9923555544 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com