Weather Update: जळगाव गारठले; तापमान ८ अंशावर

जळगाव गारठले; तापमान ८ अंशावर
Jalgaon Weather Update
Jalgaon Weather UpdateSaam tv

जळगाव : राज्‍यभरात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. दोन दिवसांपासून थंडीत प्रचंड वाढ झाली आहे. यात उत्‍तर महाराष्‍ट्रात थंडीचे (Winter Season) प्रमाण अधिक जाणवून येत आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी होत असल्‍याचा परिणाम आहे. यात जळगाव (Jalgaon) देखील गारठले असून तापमानात घसरण होऊन किमान तापमान ८.५ अंश इतके नोंदविले गेले आहे. (Letest Marathi News)

Jalgaon Weather Update
Maharashtra Weather: राज्यात हुडहुडी! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका

ममुराबाद येथील शासकीय हवामान केंद्रावर तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी स्वेटर, मफलर, हातमोजे, जॅकेटचा वापर नागरिक करीत आहेत. सोबतच ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून ऊब मिळविण्याचा प्रयत्नही सुरू आहे. तीन दिवसांपासून गारठा वाढला आहे. रविवारी अधिकच थंडी असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला होता. दुपारी कडक उन्ह असूनही थंडी जाणवत होती. उन्हातही स्वेटरचा वापर करताना नागरिक दिसून आले.

सकाळी फिरणाऱ्यांची संख्या वाढली

थंडीत व्यायाम केल्याने आरोग्य निरोगी राहाते. यामुळे लहानांपासूनच ज्येष्ठांपर्यंत सर्वच थंडीत व्यायाम करणे, सकाळी फिरायला जातात. गेल्या काही दिवसांपासून सकाळी पायी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. स्वेटर, मफलर घालून नागरिक फिरायला जातात. काही युवकांनी व्यायामशाळेत जाऊन शरीर तंदुरुस्तीसाठी व्यायाम करणे सुरू केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com