सुसाईड नोट लिहत महिलेची आत्‍महत्‍या; अज्ञात व्‍यक्‍तीने बदनामी केल्‍याचा उल्‍लेख

सुसाईड नोट लिहत महिलेची आत्‍महत्‍या; अज्ञात व्‍यक्‍तीने बदनामी केल्‍याचा उल्‍लेख
सुसाईड नोट लिहत महिलेची आत्‍महत्‍या; अज्ञात व्‍यक्‍तीने बदनामी केल्‍याचा उल्‍लेख
Suicide CaseSaam tv

एरंडोल (जळगाव) : येथील जहांगीरपुरा भागात राहणाऱ्या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्‍महत्‍या करण्यापूर्वी विवाहितेने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर अज्ञात व्यक्तीला शोदाण्याचे आव्हान पोलिसांसमोर (Police) उभे राहिले आहे. (jalgaon news Woman commits suicide by writing suicide note in erandol)

Suicide Case
यात्रोत्सवात अल्‍पवयीन चोरट्यांनी लांबविल्‍या सोनसाखळ्या

एरंडोल येथील जहांगीरपुरा भागात (Jalgaon News) राहणाऱ्या रुपाली विश्वनाथ पाटील (वय ३४) विवाहितेने २३ एप्रिल २०२२ रोजी दुपारच्या वेळी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केली होती. रुपाली पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट (Suicide Note) लिहिली असून त्यात एका अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. मयत रुपाली हिचे पच्छात नऊ वर्ष वयाचा मुलगा व तीन वर्ष वयाची मुलगी, पती असा परिवार आहे.

चिठ्ठीत भावनिक मजकूर

रुपाली पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत माझ्या घरच्यांचा काही दोष नाही. माझी अज्ञात व्यक्तीने केलेली बदनामी मी सहन करू शकले नाही. घरातील देव्हाऱ्याजवळ एक पर्स असून त्यामध्ये मी शिलाई काम करून जमवलेली रक्कम असून ती माझ्या मुलांची आहे असा मजकूर आहे. आयुष्यात मुलांसाठी खूप करायचे होते. मात्र मी हरले असून मुलगा व मुलीस सांभाळून घ्या असा भावनिक मजकूर आहे. याबाबत श्रीराम राजाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांचे मार्गदर्शनाखाली जुबेर खाटिक, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, राजेश पाटील तपास करीत आहेत. दरम्यान विवाहितेची बदनामी करणारा अज्ञात व्यक्ती कोण? विवाहितेने आत्महत्येसारखे टोकाचे पाउल का उचलले याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून अज्ञात व्यक्तीस पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.