जळगावातील लाकडी गणपती..पिंपळाच्‍या झाडातून प्रकटले बाप्‍पा अन्‌ तेथेच झाली प्राणप्रतिष्ठा

जळगावातील लाकडी गणपती..पिंपळाच्‍या झाडातून प्रकटले बाप्‍पा अन्‌ तेथेच झाली प्राणप्रतिष्ठा
जळगावातील लाकडी गणपती..पिंपळाच्‍या झाडातून प्रकटले बाप्‍पा अन्‌ तेथेच झाली प्राणप्रतिष्ठा
लाकडी गणपती

जळगाव : नवसाला पावणारा मानाचा गणपती म्हणून जळगावातील लाकडी गणपतीचा नावलौकिक आहे. गणेश चतूर्थीपासून अनंत चर्तुदशीपर्यंत या मंदिरात दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी असते. (jalgaon-news-wooden-Ganpati-in-Jalgaon-Revealed-from-the-Pimpala-tree)

जळगावात ७५ वर्षांपूर्वी झाडातून गणेश मूर्ती प्रकट झाल्यामुळे या गणपतीला विशेष महत्त्व आहे. या गणपतीला नवसाला पावणारा लाकडी गणपती असे पूर्वजांनी नाव दिल्याने या गणपती दर्शनासाठी भाविक गर्दी करत नवस फेडतात.

पिंपळाच्‍या झाडातून प्रकटली मुर्ती

नवसाचा लाकडी गणपतीच्या दर्शनासाठी गुजरात, राजस्थान अशा राज्यातून देखील लोक येत असतात. ही गणेशाची मूर्ती ७५ वर्षापूर्वी पिंपळाच्या झाडातून प्रकटलेली आहे. परंतु हे झाड तुटले असून गणपतीची मूर्ती तशीच आहे. त्यामुळे या गणपतीला विशेष महत्त्व आहे.

लाकडी गणपती
सत्‍तापालटची भाजपला भिती; सर्व सदस्‍यांना केले ‘नॉट रिचेबल’

नवस होतो पूर्ण

जळगाव तहसील कार्यालयासमोर झाडातून प्रकटलेला हा लाकडी गणपती हा गणपती झाडतण हुबेहूब प्रकट झाल्याने पूर्वजांनी त्याला लाकडी गणपती असे नाव दिले. या गणपतीचे विशेष महत्त्व म्हणजे गणपतीला जे नवस बोलले जातात ते पूर्ण होतात. त्यामुळे प्रत्येक भक्त गणरायाच्या दर्शनाला येऊन नवस बोलतो आणि ते गणपती बाप्पा पूर्ण देखील करतात अशी भाविकांची श्रध्दा आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com