‘स्वच्छ भारत’मध्ये यावल पालिका झळकली; देशपातळीवर चौथा क्रमांक

‘स्वच्छ भारत’मध्ये यावल पालिका झळकली; देशपातळीवर चौथा क्रमांक
‘स्वच्छ भारत’मध्ये यावल पालिका झळकली; देशपातळीवर चौथा क्रमांक
swachha Bharat

यावल (जळगाव) : येथील पालिकेने स्वच्छ भारत अभियान २०२१ अंतर्गत कचरामुक्त शहर (जीएफसी) या केंद्र शासनाच्या तिन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशपातळीवर चौथा क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी दिली आहे. (jalgaon-news-Yaval-Palika-starred-in-Swachh-Bharat-Number-four-in-the-india-country)

swachha Bharat
नवीन चालकांच्‍या हाती स्‍टेअरींग..गोंधळानंतर जळगावातून धुळ्यासाठी पहिली बस रवाना

दिल्ली येथे शनिवारी (ता. २०) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय सचिव आवासन आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते नगराध्यक्षा नौशाद तडवी व पालिकेचे अभियंता योगेश मदने यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी छत्तीसगडचे नागरी प्रशासन आणि विकास राज्यमंत्री डॉ. शिवकुमार डहरिया व स्वच्छ भारत अभियानाच्या संचालिका व सहसचिव रूपा मिश्रा उपस्थित होत्या. हा पुरस्कार विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिमाखदार व भव्य समारंभात प्रदान करण्यात आला.

या बाबींची दखल

कचरामुक्त शहर मानांकन (जीएफसी) या स्पर्धेत शहरातील भौतिक व कागदोपत्री स्तरातील कामकाजाची तपासणी व मूल्यांकन शासनाने नेमलेल्या त्रयस्थ समितीमार्फत झाले होते. त्यानुसार देश पातळीवर यावल नगरपरिषदेने उत्तम कामगिरी केली होती. येथील पालिकेने कचरा संकलनासाठी प्रभागनिहाय घंटागाड्याची व्यवस्था, कचरा विलगीकरण याबाबत प्रभागनिहाय जनजागृती अभियान, आरएफआयडी सिस्टिमचा वापर करून शहरातून शंभर टक्के कचरा संकलन, कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया कंपोस्ट खत निर्मिती, हागणदारीमुक्तीचा दर्जा कायम ठेवत शहरातील सार्वजनिक रस्त्यांची नित्याची साफसफाई व गटारींची नियमित स्वच्छता आदी कामे केल्यामुळे केंद्र शासनातर्फे दखल घेण्यात आली.

या पुरस्काराचे श्रेय शहरातील नागरिकांसह नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगार, कर्मचारी, स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच मुख्याधिकारी यांचे आहे. उपनगराध्यक्ष, सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांनी सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच आज यावल शहराचे नाव देशपातळीवर झळकले आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानते.

- नौशाद तडवी, नगराध्यक्षा, यावल

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com