
यावल (जळगाव) : प्रवाशांना घेवून जात असलेल्या बसवर अचानक झाड कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. यात १२ प्रवाशी जखमी झाले असून जखमींना यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (jalgaon news yawal bhusawal bus fallen tree Twelve passengers injured)
यावल (Yawal) आगाराची बस (क्र. एमएच २०, बीएल २५४२) आज दुपारी २ वाजेच्या सुमारास यावलकडून भुसावळकडे जात होती. या दरम्यान रस्त्यावरील पाटचारीजवळ असलेले मोठे झाड बसवर (St Bus) कोसळले. यात चालकासह १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, यावल आगार प्रमुख जितेंद्र जंजाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालयात (Hospital) जात जखमींची माहिती घेतली.
अपघातातील जखमी
अपघातात सुरेश पंढरीनाथ महाजन, इच्छाराम टिकाराम राजपूत, पंडित लक्ष्मण परणकर (वय ६६, रा. यावल), शकुंतला विलास चौधरी (वय ६०, रा. धानोरा), पद्माबाई रमेश कोळी (वय ५०), मंगला रामदास चौधरी (वय ५५), सुशिलाबाई किसन धनगर (वय ६०, रा. मुक्ताईनगर), जोवरा रशीद खाटीक (वय ५०, रा. अडावद), सुरेश पंढरीनाथ महाजन (वय ५२), कल्पना संतोष चौधरी (वय ५५), दीपक येवलू वानखेडे (वय २४) आणि नीलम शैलेंद्र पाटील (वय १७) असे १२ जण जखमी झाले आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.