अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करत अत्‍याचार

अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करत अत्‍याचार
अल्‍पवयीन मुलीचे अपहरण करत अत्‍याचार
Minor Girl Kidnapping Saam tv

यावल (जळगाव) : तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी संबंधित संशयित तरुणासह त्यास मदत करणाऱ्या अन्य तीन जणांसह चार संशयितांविरुद्ध येथील पोलिसात (Police) पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. (jalgaon news yawal Kidnapping and abduction of a minor girl)

Minor Girl Kidnapping
तलवारसाठा प्रकरणी आणखी दोन आरोपी ताब्‍यात

यावल (Yawal) तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण त्याच गावातील संशयित चंद्रकांत उर्फ भूषण आत्माराम सोनवणे (कोळी) याने २७ एप्रिलला केले. चंद्रकांतने महेंद्र कोळी (रा. आसोदा, ता. जळगाव) याचे मदतीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. संशयित चंद्रकांत त्या अल्पवयीन मुलीस नाशिक (Nashik) येथील नातेवाईक जितेंद्र कोळी व दीपाली जितेंद्र कोळी यांचे घरी घेऊन गेला. त्या ठिकाणी सलग चार दिवस मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

मुलीने कुटुंबियांना सांगितली घटना

सदर अल्पवयीन मुलगी रविवारी (ता.१) घरी परतल्यावर तिने घडलेली घटना कुटुंबियांना सांगितली. यापूर्वीच येथील पोलिस ठाण्यात संबंधित मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. संशयित चंद्रकांत उर्फ भूषण सोनवणे (कोळी) यास ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात इतर तीन संशयितांचा समावेश करण्यात येऊन त्यांचे शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशीत कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवालदार नरेंद्र बागुले हे करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.