
जळगाव : शहरातील शिवकॉलनी परिसरात २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Jalgaon) केली. अक्षय विलास सूर्यवंशी असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापुर्वी अक्षयने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. (Latest Marathi News)
जळगावातील शिवकॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या अक्षय सूर्यवंशी हा खासगी कंपनीत आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी (२३ मे) रात्री दहाला जेवण करून झोपला होता. मध्यरात्री त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. हा प्रकार बुधवारी (ता. २४) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. मुलगा अक्षयला पाहताच आईने हंबरडा फोडत आक्रोश केला. मृताच्या पश्चात आई मालतीबाई आणि मोठा भाऊ ओम असा परिवार आहे.
अजून त्रास नको...
आत्महत्या करण्यापूर्वी अक्षयने चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्याने 'शिक्षण झालं, पण घरच्यांच्या अपेक्षा, स्वप्न पूर्ण नाही करु शकलो. ओझं झालोय मी, अजून त्रास नाही देऊ शकत, म्हणून मी जातोय, कोणाला जबाबदार धरू नये.’ असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केलेला आहे. पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.