Jalgaon News: मुलगा आला नाही म्‍हणून आई गेली घरी; दार उघडताच बसला धक्‍का

मुलगा आला नाही म्‍हणून आई गेली घरी; दार उघडताच बसला धक्‍का
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : औद्योगीक वसाहत परिसरातील सुप्रीम कॉलनीतील तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Jalgaon) केल्याची घटना सोमवार(ता. १५) घडली. घटना कळाल्यावर नातेवाईक व मित्रपरिवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) एकच गर्दी केली होती. आकाश सुरेश शेरे (वय १९) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Tajya Batmya)

Jalgaon News
Sambhaji Nagar: ऑनलाइन व्यवसायात कर्जबाजारी; व्यापाऱ्याने संपविले जीवन

जळगाव- औरंगाबाद रोडवर औद्योगीक वसाहत शेजारील सुप्रीम कॉलनीत आकाश शेरे हा आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत वास्तव्याला होता. आकाश एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ६ वाजता आकाशाने आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी आंघोळ करण्यासाठी गेला. घरी एकटा असतांना त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Jalgaon News
Jalgaon News: विवाह समारंभाची लगबग; नराधमाचा चिमुकलीवर अतिप्रसंग

परत न आल्‍याने आईला आली शंका

आकाश हा टपरीवर का आला नाही? याचा विचार करत आई सविता ह्या घरी आल्या. घरात जाताच आकाशने छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यानंतर आईने एकच हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक व तरुणांनी धाव घेऊन मृतदेह खाली उतरवत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्‍याला मयत घोषित केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com