जळगावच्‍या तरूणाने फडकविला एल्ब्रुस शिखरावर तिरंगा

जळगावच्‍या तरूणाने फडकविला एल्ब्रुस शिखरावर तिरंगा
Mount Elbrus
Mount ElbrusSaam tv

जळगाव : संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. यानिमित्ताने हर घर तिरंगा या अभियानात प्रत्येक घरावर भारताचा तिरंगा (Indian Flag) फडकविण्यात आला. याच स्‍वातंत्र दिनी जळगाव (Jalgaon) शहरातील योगेश बडगुजर या तरूणाने युरोपमधील एल्ब्रुस शिखरावर तिरंगा फडकविला आहे. (Jalgaon News Young Man Indian Flag on the Elbrus peak)

Mount Elbrus
रक्षाबंधनाला नवीन कपडे घेवून दे म्‍हणाला अन्‌..बहिणीला भेटायला जात असताना अपघात

जळगाव शहरातील दादावाडी येथील रहिवासी योगेश बडगुजर याने युरोपमधील सर्वोच्च (Mount Elbrus) एल्ब्रुस हे शिखर आपल्या ५ सहकाऱ्यांसोबत सर केले आहे. विशेष म्हणजे शिखर सर करण्यासाठी वातावरण चांगले नसताना मायनस २५ अंश इतके तापमान व सोबतच ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा सामना करत योगेशने युरोपातील सर्वोच्च एल्ब्रुस या शिखरावर तिरंगा फडकविला. एल्ब्रुस हे या शिखराची उंची ५ हजार ६४२ मीटर (१८ हजार ५१० फूट) इतकी आहे. हे शिखर रशियामध्ये येत असून रशियाचा हा भाग युरोप खंडात मोडला जातो.

अन्‍य गिर्यारोहकांनी चढाई थांबवली पण..

जळगाव शहरात योगेशचे वडील प्रकाश बडगुजर हे पत्नीसह राहतात. प्रकाश बडगुजर हे शिवणकाम करतात. तर योगेश हा मुंबई (Mumbai) महापालिकेतील अग्निशामक दलात गेल्या ५ वर्षांपासून फायरमन या पदावर कार्यरत आहे. योगेशसोबत भारतातील विविध शहरांमधील ५ सहकारी देखील होते. शिखर सर करण्यासाठी योगेश आपल्या सहकाऱ्यांसोबत १२ ऑगस्टपासूनच बेसमध्‍ये सहभागी झाला होता. १५ ऑगस्ट रोजीच्‍या रात्री १ वाजता शिखर सर करण्यास सुरुवात केली. १५ ऑगस्टला वातावरण अतिशय खराब असल्याने इतर गिर्यारोहकांनी चढाई थांबवली. मात्र, योगेशने आपल्या सहकाऱ्यांसोबत चढाई कायम ठेवत १५ ऑगस्टला सकाळी ८.३० वाजता कठीण परिस्थितीत हे शिखर सर करत भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकविला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com