दुर्देवी..पोहण्यासाठी गेलेल्‍या तरूणाचा बुडून मृत्‍यू

दुर्देवी..पोहण्यासाठी गेलेल्‍या तरूणाचा बुडून मृत्‍यू
death
deathsaam tv

जळगाव : धामणगाव (ता. जळगाव) येथील वीस वर्षीय तरुण मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्‍याचा बुडून मृत्‍यू झाला. (jalgaon news young man who went for a swim drowned)

death
छत्रपती शिवरायांच्या विनापरवानगी उभारलेल्‍या पुतळ्यावरून तणाव

धामणगाव येथील अक्षय राजू सपकाळे (वय २०) असे मयत तरुणाचे नाव आहे. तुरखेड शिवाराजवळ सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तापी नदीत (Tapi River) मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. (Jalgaon News) नदीत पोहत असताना त्‍याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामुळे तो बुडायला लागला. सोबतच्या मित्रांनी आणि ग्रामस्थांनी त्याला तातडीने बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

कुटूंबियांचा आक्रोश

अक्षयच्‍या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अक्षय सपकाळे याचे आई, वडील शेती करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून नोंद करण्याचे काम सुरू होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com