सभा जिल्‍हा परिषदेची गदारोळ केंद्र, राज्य सरकारच्‍या कामावर

सभा जिल्‍हा परिषदेची गदारोळ केंद्र, राज्य सरकारच्‍या कामावर
सभा जिल्‍हा परिषदेची गदारोळ केंद्र, राज्य सरकारच्‍या कामावर
Jalgaon ZP

जळगाव : जळगाव जिल्‍हा परिषदेची सभा होती. मात्र पहिले वीस मिनिट जिल्‍हा परिषदेशी संबंधी कोणत्‍याही विषयावर चर्चा झाली नाही. उलट राज्‍य व केंद्र सरकारच्‍या कामावरून सभागृहात गदारोळ झाल्‍याचे पाहण्यास मिळाले. यामुळे जणू काही विधीमंडळाचे कामकाज सुरू असल्‍याचेच चित्र जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात पाहण्यास मिळाले. (jalgaon-news-zilha-parishad-general-meeting-bjp-and-shiv-sena-tolk-state-goverment-issue)

जिल्‍हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज (ता.१४) अध्‍यक्षा रंजना पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. सभेला मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपाध्‍यक्ष लालचंद पाटील यांच्‍यासह सर्व सभापती व अधिकारी हजर होते.

राज्‍य सरकारच्‍या अभिनंदन ठरावावरून सुरवात

अतिवृष्‍टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजाला मदत म्‍हणून राज्‍य सरकारने मदत जाहीर केली आहे. याबाबत नाना महाजन यांनी शासनाचा अभिनंदन ठराव मांडला. यावर भाजपचे पोपट भोळे यांनी आक्षेप मांडत. शासनाने दिलेली मदत ही तुटपुंजी असल्‍याचे म्‍हटले. अतिवृष्‍टीमुळे जमिनी खरडून गेल्‍या आहेत. त्‍याचा मोबदला शेतकरीला मिळावा; अशी मागणी पोपट भोळे यांनी केली. मात्र महाविकास आघाडीचे चांगले काम असून शेतकरीच्‍या विषयात राजकारण नको असे शिवसेनेचे रावसाहेब पाटील यांनी सत्‍ताधारी भाजपला उद्देशून म्‍हटले. यानंतर राज्‍य व केंद्र सरकारच्‍या कामावरच चर्चा रंगल व त्‍यावरच गदारोळ झाला.

Jalgaon ZP
Breaking जिल्‍हा बँकेसाठी एकनाथ खडसेंचा अर्ज

कर वसुलीची खोटी आकडेवारी

ग्रामपंचायतींकडून कर वसुली केली जाते. वार्षिक अहवालात याची ८० टक्‍के वसुली दाखविण्यात आली आहे. असे असेल तर ग्रामपंचायतींकडून जिल्‍हा परिषदेचे ३० कोटी रूपये घेणे असताना रक्‍कम जमा का केली जात नाही. अर्थात वार्षिक अहवालात दाखविलेली वसुलीची आकडेवारी खोटी दाखवून सभागृहाची दिशाभूल केली जात आहे. असा आरोप विरोधकांनी केला. यावरून सभागृहात ठेवण्यात आलेला वार्षिक अहवाल नामंजुर करण्यात आला.

Related Stories

No stories found.