Zp School: शापोआ गैरव्‍यवहार; अतिप्रदान बिले देणाऱ्यांच्‍या वेतनवाढीला रेड सिग्‍नल

शापोआ गैरव्‍यवहार; अतिप्रदान बिले देणाऱ्यांच्‍या वेतनवाढीला रेड सिग्‍नल
Zp School: शापोआ गैरव्‍यवहार; अतिप्रदान बिले देणाऱ्यांच्‍या वेतनवाढीला रेड सिग्‍नल
Poshan aaharsaam tv

जळगाव : जिल्ह्यातील चार तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेत ठेकेदाराला नियमित बिलापेक्षा १ लाख ६७ हजार रूपये इतकी रक्‍कम जास्त अदा झाल्याचे समोर आले होते. यात चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार (Jalgaon Zp) दोषी आढळून आलेले पाच अधिकारी आणि ९ मुख्याध्यापक अशा एकुण १४ जणांची एक वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. (jalgaon news zp school poshan aahar fraud pay rise for overpayment bill payers one year)

Poshan aahar
St Strike: धुळे विभागात ४७ बस सुरू; ६२५ कर्मचारी दाखल

शालेय पोषण आहार (Poshan Aahar) संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी पोषण आहारातील गैरव्यवहाराबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्‍याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर यांनी जानेवारी ते डिसेंबर २०१७ या काळातील (Chalisgaon) चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर (Muktainagar) आणि जळगाव या चार तालुक्यातील पोषण आहार योजनेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात चौकशीसाठी समिती नियुक्त केली होती.

यांच्‍यावर कारवाईची टांगती तलवार

सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (Ceo Pankaj aashiya) यांनी दोषी आढळून आलेल्या तत्कालीन पाच गट शिक्षणाधिकारी आणि ९ तत्कालीन मुख्याध्यापकांवर एक वेतनवाढ रोखण्याच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्याकडून याप्रकरणात पुढील कारवाई करण्यात येत आहे. यामध्‍ये जे. डी. पाटील (तत्कालीन विस्तार अधिकारी मुक्ताईनगर), एस. पी. विभांडिक (विस्तार अधिकारी चाळीसगाव), आर. व्ही. बिर्‍हाडे (विस्तार अधिकारी जळगाव), कल्पना चव्हाण (गटशिक्षणाधिकारी जळगाव), सचिन परदेशी (गटशिक्षणाधिकारी भडगाव) तसेच सुलोचना साळुंके (तत्कालीन मुख्याध्यापक गिरड ता.भडगाव), सुनंदा महाजन (मुख्याध्यापक चांगदेव ता.मुक्ताईनगर), सुरेश सुरवाडे (मुख्याध्यापक चिंचोळ ता.मुक्ताईनगर), सुपडू हेरोळे (नांदवेल, मुक्ताईनगर), जबीउल्लाशाह अताउल्लाशहा (मुख्याध्यापक उर्दु शाळा वढोदा ता. मुक्ताईनगर), राजेंद्र अडावदकर (मुख्याध्यापक मांदुर्णे ता.चाळीसगाव), मिलिंद कोल्हे (मुख्याध्यापक रायपुर ता.जळगाव), नाहिदा अंजम शेख सलीम व निहकत अंजुम नाजीमोद्दीन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com