Jalgaon News : आजोबांच्या अंत्ययात्रेला आईवडील गेले; घरी एकट्या असलेल्या मुलाला बिबट्यानं शेतात फरफटत नेले

आजोबांच्या अंत्ययात्रेला आईवडील गेले; घरी एकट्या असलेल्या मुलाला बिबट्यानं शेतात फरफटत नेले
Jalgaon News Leopard Attack
Jalgaon News Leopard AttackSaam tv

जळगाव : आजोबांचे निधन झाल्‍याने आई– वडील अंत्‍ययात्रेस गेले होते. यावेळी त्‍यांचा एकुलता एक मुलगा सुजित दिगंबर पाटील हा घरी एकटाच होता. सकाळी तो शेताकडे शौचास गेला असता त्‍याच्‍यावर मागून बिबट्याने हल्‍ला (Leopard Attack) करत ओढत उसाच्‍या शेतात नेले. सायंकाळी घरी परतलेल्‍या आई– वडीलांनी (Jalgaon News) शोधाशोध केल्‍यानंतर मोबाईल लोकेशनवरून त्‍याचा आज तपास लागला. (Breaking Marathi News)

Jalgaon News Leopard Attack
Chalisgaon News: मुक्‍या प्राण्यांना वाचवायला धावला पण जीव गमावला; रेल्‍वे ट्रॅकवरील भीषण अपघात गुराख्यासह आठ जनावरांचा मृत्‍यू

सार्वे (ता. पाचोरा) परिसरात आज सकाळी सदर घटना उघडकीस आली. सार्वे येथील दिगंबर पाटील हे शेती करून कुटूंबाचा उदरविर्वाह करतात. त्‍यांना सुजित हा एकुलता एक मुलगा तर मोठ्या मुलीचे लग्‍न झाले आहे. दरम्‍यान सुजित याच्‍या आजोबांचे (आईचे वडील) निधन झाल्‍याने आई– वडील हे बुधवारी (२९ मार्च) हतनूर (कन्‍नड) येथे अंत्‍ययात्रेसाठी गेले होते. यावेळी सुजित हा घरी एकटाच होता. बुधवारी सकाळी साडेआठ– नऊ वाजेच्‍या सुमारास सुजित हा शौचास गेला असता त्‍याच्‍यावर बिबट्याने मागून हल्‍ला करत उसाच्‍या शेतात ओढत नेले.

Jalgaon News Leopard Attack
Accident News: प्रवाशांनी भरलेल्‍या रिक्षाला ट्रकने उडविले; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्‍यू

मोबाईल लोकेशनवरून शोध

अंत्‍ययात्रेवरून सुजितचे आई– वडील सायंकाळी घरी परत आले. यावेळी घराला कळी लावलेली दिसून आली. मुलाच्‍या मोबाईलवर संपर्क केला असता फोन उचलला नाही. यामुळे त्‍यांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. परंतु, सुजित मिळून आला नाही. यामुळे रात्री नऊच्‍या सुमारास पोलिसात जावून तक्रार दिली. यानंतर नागरीकांनी शोधनू काढल्‍यानंतर गावापासून ५०० मीटरच्‍या अंतरावर दाखविले. पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिस दाखल होते. केले असता यानंतर त्‍या दिशेने शोध घेतला असता उसाच्‍या शेतात मोबाईल व सुजितचा मृतदेह आढळून आला. वन्‍य प्राण्याने हल्‍ला केल्‍याचे लक्षात आले. वनविभागाच्‍या पथकाने पंचनामा करत बिबट्याने (Leopard) हल्‍ला केल्‍याचा अंदाज वर्तविला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com