Parola News: सीडीएम मशिनमध्ये भरल्या पाचशेच्या बनावट नोटा

सीडीएम मशिनमध्ये भरल्या पाचशेच्या बनावट नोटा
Parola News
Parola NewsSaam tv

पारोळा (जळगाव) : सीडीएम मशिनमध्ये खातेदाराने भरलेल्या पाचशेच्या सहा (Fake Notes) नोटा बनावट निघाल्याने चोरवड (ता. पारोळा) येथील एकाविरुद्ध (Parola) पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

Parola News
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील 'या' गावात राजकीय पुढा-यांना गाव बंदी, ग्रामसभेचा ठराव; जाणून घ्या नेमकं कारण

पारोळा येथील एचडीएफसी बँक शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र किशोर खरे यांनी फिर्याद दिली. २९ मेस सायंकाळच्या सुमारास चोरवड (ता. पारोळा) येथील राजू आत्माराम पाटील हे (Bank) बँकेच्या कॅश डिपॉझिट मशिनद्वारे आपल्या खात्यात भरणा करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पाचशे रुपयांच्या सहा नोटा सीडीएम मशिनमध्ये भरल्या. परंतु या नोटा खोट्या व बनावट असल्याने त्या खात्यात न जमा होता सीडीएमच्या कॅसेटमध्ये जमा झाल्या. दरम्यान, बँकेचे कॅशिअर तुषार जोशी व रमेश सपकाळे यांनी तपशील तपासला असता या नोटा बनावट आढळून आल्या.

Parola News
Girish Mahajan News: कापसाच्या भावाबाबत पंधरा दिवसात निर्णय; मंत्री गिरीश महाजन

दोन्ही कर्मचाऱ्यांनी ही बाब तत्काळ व्यवस्थापक खरे यांना सांगितली. त्यानंतर नोटा जमा करणाऱ्या खातेदाराचा खाते क्रमांक तपासला असता तो चोरवड येथील राजू आत्माराम पाटील यांचा निघाल्याने त्यांना बँकेत बोलावून सदरील प्रकार सांगितला. दरम्यान, पाटील यांनी पैसे भरल्याचे कबूल केले असून, बनावट नोटा आढळल्याप्रकरणी पारोळा पोलिसात राजू पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक योगेश जाधव तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com