Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

Jalgaon News: पाण्याची मोटर चालू करायला गेली अन्‌..चिमुकलीचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू

पाण्याची मोटर चालू करायची गेली अन्‌..चिमुकलीचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू

यावल (जळगाव) : गरीब आदिवासी कुटूंबासाठी आजची सकाळ अंधार बनून आली होती. कोळवद (ता. यावल) येथील (Yawal) आदीवासी कुटुंबातील चिमकुलीचा विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी घडली. (Breaking Marathi News)

Jalgaon News
Accident News: दुचाकीला धडक देत भरधाव कार पुलाखाली कोसळली; सात जण गंभीर जखमी

यावल तालुक्यातील कोळवद गावात वास्‍तव्‍यास असलेले संजय बिस्मिल्ला तडवी यांची मुलगी मुस्कान तडवी (वय १४) आज (१२ मे) सकाळी साडेआठच्या सुमारास घरातील पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर लावत होती. या दरम्‍यान मोटारीत विजेचा प्रवाह उतरला असल्याने तिला विजेचा धक्का लागून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

Jalgaon News
Fraud Case: नोकरीच्या आमिषाने फसवणूक; १५ लाख गंडविले

रुग्णालयात नेले परंतु..

विजेचा धक्का लागल्याने कुटुंबीय व गावातील काही नागरीकांच्‍या मदतीने तात्काळ तिला यावल येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र येथे तिला वैद्यकीय अधिकारींनी मृत घोषीत केले. मयत मुस्कान तडवीच्या अपघाती मृत्यु झाल्याने गावात सर्वत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर या मरण पावलेल्या चिमकुलीच्या आदीवासी कुटुंबास शासनाकडून काहीतरी मदत मिळाल्यास कुटुंबाला हातभार लागेल अशी अपेक्षा परिसरातील आदीवासी बांधवांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com