Jalgaon: ग्रामपंचायत कर वसुलीच्‍या खोट्या आकडेवारीला विराम

ग्रामपंचायत कर वसुलीच्‍या खोट्या आकडेवारीवर असेल लक्ष
Jalgaon ZP Pankaj Aashiya
Jalgaon ZP Pankaj AashiyaSaam tv

जळगाव : ग्रामपंचायतींची कर वसुलीत प्रत्‍यक्ष वसुली व कागदावरील वसुलीच्‍या आकडेवारीत मोठी तफावत असते. ही तफावत प्रकर्षाने जाणवून येत असते. परंतु, आता खरी आकडेवारी समोर येण्यासाठी ‘प्रिया सॉफ्ट’ या वर्षीपासून पुन्‍हा कार्यान्वित केली जात आहे. यामुळे ग्रामसेवकांकडून येणारी खोटी आकडेवारी थांबेल; असे जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया (CEO Pankaj Aashiya) यांनी संवाद साधताना सांगितले. (Jalgaon News Gram Panchayat Tax Recovery)

Jalgaon ZP Pankaj Aashiya
सध्याची राजकीय परिस्थिती म्‍हणजे ‘सैराट’चा दुसरा पार्ट; धुळ्यातील कृषी कन्‍येकडून तुलना

डॉ. आशिया यांनी सांगितले, की (Jalgaon) जळगाव जिल्‍ह्यातील ग्रामपंचायतींच्‍या वसुलीबाबत खूप तक्रारी आहेत. प्रत्‍यक्षात ४० ते ५० टक्‍के वसुली असताना ग्रामसेवकांकडून ती कागदावर ७० ते ८० टक्‍के दाखविली जाते. हे प्रकार टाळण्यासाठी या वर्षीपासून प्रिया सॉफ्ट कार्यान्वित करण्यात येत आहे. यात ग्रामपंचायतीत (Gram Panchayat) होत असलेली वसुली त्‍या-त्‍या वेळेस ग्रामसेवकास नोंदणी करावयाची आहे. ती ऑनलाईन दिसणार आहे. यामुळे खोटी आकडेवारी येथे टाकली जाणार नाही.

शंभर टक्‍के ओडीएफ प्‍लस करायचे

जिल्‍हा शंभर टक्‍के ओडीएफ प्‍लस करायचे उद्दीष्‍ट डोळ्यासमोर आहे. त्‍या दृष्‍टीने काम सुरू आहे. सद्यःस्थितीत ८०० गावांमध्‍ये काम सुरू आहे. तसेच वैयक्तिक शौचालयांसोबत सार्वजनिक शौचालय असणे देखील आवश्‍यक असून ५६१ सार्वजनिक शौचालयांना मंजुरी देण्यात आली आहे. तर ५० हजार शोष खड्डेदेखील तयार केले जाणार आहेत. मुख्‍य गावे हगणदारीमुक्‍त करण्यासाठी अंगणवाडी, शाळांपासून शौचालय वापराची सवय लागायला हवी. याकरीता ६०० अंगणवाडींमधील अपूर्ण शौचालय पूर्ण करायचे काम सुरू असल्‍याचे सीईओ डॉ. आशिया यांनी सांगितले.

प्रशासक म्‍हणून सर्वच शक्‍य नाही

जिल्‍हा परिषदेच्‍या पदाधिकारी, सदस्‍यांचा कालावधी मार्चमध्‍ये संपला. यामुळे जिल्‍हा परिषदेवर चार महिन्‍यांपासून प्रशासक आहे. सीईओ डॉ. पंकज आशिया हे प्रशासक म्‍हणून काम पाहत असून याबाबत बोलताना ते म्‍हणाले, की प्रशासक असताना राजकीय हस्‍तक्षेप नसल्‍याने काही न होणारी कामे साध्‍य करता आली. परंतु, सदस्‍य नसल्‍याने गावांमध्‍ये असलेल्‍या तक्रारींची माहिती समजत नसल्‍याने ती काम होवू शकली नाही. अर्थात प्रशासक म्‍हणून काम करताना सर्वच शक्‍य होत नसल्‍याचे डॉ. आशिया यांनी सांगितले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com