रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्‍यू; एसटी बंद असल्‍याने जीवघेणा प्रवास

रिक्षातून पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्‍यू; एसटी बंद असल्‍याने जीवघेणा प्रवास
Accident
AccidentSaam tv

जळगाव : जिल्ह्यातील बोदवडला महाविद्यालयात येत असलेल्‍या विद्याथ्‍र्यांना एसटी बंद असल्‍याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास अकरातील विद्यार्थिनीच्‍या मृत्‍यूचे कारण ठरले. कॉलेज सुटल्यावर रिक्षात बसून घरी जात असताना धावत्या रिक्षातून तोल (Accident) जावून पडल्‍याने तिचा मृत्‍यू झाला. तर अन्‍य एक जखमी आहे. (jalgoan news accident news Student dies after falling from rickshaw)

Accident
Corona Vaccination: बारा वर्षांपुढील मुलांकडून अल्प प्रतिसाद

बोदवड (Bodwad) शहरातील न. ह. का. हायस्कूलमध्‍ये शेलवड येथील दोन विद्यार्थिनी अकरावी सायन्सचे शिक्षण घेत होत्‍या. रोज रिक्षानेच ये– जा करत होते. यातील रोहानी राजेंद्र धनगर व तृप्ती भगवान चौधरी आज सकाळी पेपर संपल्‍यावर बस नसल्‍याने ॲपे रिक्षाने घरी जात होते. दरम्‍यान जामनेर (Jamner) रोडवरील नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरू असून त्याजवळ रस्त्यावर विद्यार्थिनी रिक्षांमधून पडून गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना लागलीच बोदवड येथील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल केले. यानंतर त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले.

रस्‍त्‍यातच झाला मृत्‍यू

इयत्ता अकरावीमधील १७ वर्षीय विद्यार्थिनी तोल गेल्याने धावत्या रिक्षेतून तृप्ती चौधरी खाली पडली. या अपघातात तिच्या मेंदूला गंभीर इजा झाली. यानंतर जळगावला (Jalgoan) नेताना तुप्ती भगवान चौधरी रस्त्यात मृत्यू (Accident Death) झाला. यानंतर तिचे शवविच्छेदन जळगाव येथील जिल्हा रुग्णालयमध्ये करण्यात आले. तर रोहीनी धनगर ही विद्यार्थ्यांनी जखमी असुन तिच्‍यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात कोणतीही नोंद अद्याप झालेली नाही. तर पोलीस प्रशासनाने अवैध वाहतुकीवर निरबंध घालने गरजेचे असुन शासनाने बस आंदोलन मार्ग काढून विद्यार्थ्यांचे ये– जा करण्यासाठी बस सेवा सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com