घरात किरकोळ वाद; विवाहितेची आत्‍महत्‍या

घरात किरकोळ वाद; विवाहितेची आत्‍महत्‍या
घरात किरकोळ वाद; विवाहितेची आत्‍महत्‍या
SuicideSaam tv

जळगाव : घरातील किरकोळ कारणावरून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव (Jalgaon) तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgoan news Minor disputes at home suicide of a married woman)

Suicide
शेतकऱ्याचे लोकप्रतिनिधींच्‍या वीजबिलासाठी भिकमागो आंदोलन

जळगाव शहरातील वाघनगर परिसरातील जिजाऊ नगरामधील रहिवासी आशा विशाल इंगळे (वय २२) या पती विशाल, सासू, सासरे आणि दीर यांच्यासह वास्तव्याला होत्‍या. पती विशाल मिळेल ते काम करून उदरनिर्वाह भागवत होता. विशाल आणि दोन भाऊसोबत एकत्रच राहतात. दरम्‍यान शनिवारी (७ मे) सकाळी ९ वाजता घरात किरकोळ कारणावरून वाद झाला. या संतापाच्या भरात आशा इंगळे यांनी घराच्या वरच्या मजल्यावर जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली.

देरानीला दिसली गळफास घेतल्‍याच्‍या अवस्‍थेत

सदर प्रकार त्यांची देरानी मनिषा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून आशाबाई यांना खाली उतरवून खासगी रूग्णालयात (Hospital) उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तालुका पोलीस कर्मचारी करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.