तुरटीच्या गणेश मूर्तीबाबत आहे संशोधन; विसर्जनानंतर काय आहेत धोके
तुरटी गणेश मूर्ती

तुरटीच्या गणेश मूर्तीबाबत आहे संशोधन; विसर्जनानंतर काय आहेत धोके

तुरटीच्या गणेश मूर्तीबाबत आहे संशोधन; विसर्जनानंतर काय आहेत धोके

जळगाव : सध्या सोशीलमीडिया वर तुरटीपासून बनविलेल्या एक फुटापासून दोन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असल्याचे सांगत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुरटीच्या मूर्ती पर्यावरणासाठी किती फायदेशीर आहेत ते बिंबवले जातेय; परंतु तुरटी नैसर्गिक स्रोतांमध्ये टाकल्यास त्या जलस्रोतांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन जलीय परिसंस्था धोक्यात येणार आहे. (jalgoan-news-research-on-Ganesha-idol-of-Turti-What-are-the-dangers-after-immersion)

तुरटीच्या मूर्ती वापरण्यापूर्वी...

तुरटी हे एक रसायन आहे. नैसर्गिकरीत्या पाण्याच्या स्रोतांमध्ये नसल्यामुळे ते नक्कीच जलचर पर्यावरणाला हानी पोचविणार आहे. निसर्गाचा नियम असा आहे की प्रत्येक गोष्ट जास्त प्रमाणात विष आहे आणि हे तुरटीलाही लागू होते. त्यामुळे कोणत्याही थांबलेल्या जलस्रोतात ते जास्त प्रमाणात सोडल्याने जलीय वनस्पती आणि जीवजंतूंना अडथळा निर्माण होईल. संपूर्ण जलचर परिसंस्थेलाही धोका होईल. त्यामुळे अशा रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकत नाही.

तुरटी गणेश मूर्ती
अतिवृष्‍टीचा फटका; जळगाव जिल्‍ह्यात सहाशेहून अधिक घरांचे नुकसान

तुरटीच्या मूर्ती पर्यावरणासाठी पूरक?

मूर्ती निर्मात्यांनी तलावाच्या परिसंस्थेवर तुरटीच्या मूर्ती कशा प्रकारे परिणाम घडविणार आहेत, याचा निर्मात्याने काही अभ्यास केलेला नाही. मेहरूणसारख्या नैसर्गिक सरोवराचे जलजीवन अशा प्रयोगांसाठी ऑब्जेक्ट म्हणून वापरले जाऊ शकत नाही. जर या मूर्तींचे विसर्जन फक्त घरात केले जात असेल तर ते मंजूर केले पाहिजे. परंतु तलाव आणि विहिरींमध्ये अशा मूर्तींचे मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यासाठी जलीय परिसंस्थेला कोणत्याही प्रकारे हानी पोचणार नाही याचा संशोधन अहवाल निर्माते आणि विक्रेते यांनी मांडला पाहिजे किंवा असल्यास तो सोबत ठेवला पाहिजे. कोणत्याही आधाराशिवाय तुरटीच्या मूर्ती पर्यावरणासाठी पूरक आहेत, असा त्याचा प्रचार केला जाऊ नये.

बंदीची मागणी

यंदा विक्रेत्यांनी ग्राहकांना तुरटीपासून तलावास होणाऱ्या धोक्याची स्पष्ट सूचना देणे बंधनकारक करण्याचे आदेश काढावेत आणि भविष्यात तुरटीपासून बनणाऱ्या मूर्तींवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेचे मत्स्य अभ्यासक बाळकृष्ण देवरे, गौरव शिंदे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com