Jalna: चोरी करून विक्री केलेल्या 21 दुचाक्या जप्त; दोघांना अटक

11 लाख रुपये किमतीच्या 21 दुचाक्या जप्त
Jalna: चोरी करून विक्री केलेल्या 21 दुचाक्या जप्त; दोघांना अटक
Jalna: चोरी करून विक्री केलेल्या 21 दुचाक्या जप्त; दोघांना अटकलक्ष्मण सोळुंके

लक्ष्मण सोळुंके

जालना : जालण्यात दुचाकी चोरून Two wheeler त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी Jalna Crime Branch Police बेड्या ठोकल्या आहेत. कृष्णा सोमवारे आणि ईश्वर जाधव असे आरोपींची नावं आहेत. तर एक आरोपी फरार झाला आहे.

हे देखील पहा-

घनसावंगीसह Ghansavangi परिसरात हे आरोपी दुचाकी चोरुन आणून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली. तपासणीदरम्यान, आरोपींनी दुचाकी चोरून विक्री करत असल्याची कबुली पोलिसांकडे दिली.

या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी 11 लाख रुपये किमतीच्या 21 दुचाक्या जप्त केल्या आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकी या जालना Jalna, औरंगाबाद Aurangabad, अहमदनगर Ahemadnagar या जिल्ह्यातून चोरण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

Jalna: चोरी करून विक्री केलेल्या 21 दुचाक्या जप्त; दोघांना अटक
Pune : खेड मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

या गाड्या फायनान्सच्या असल्याचं सांगत कागदपत्रं नंतर आणून देतो असा खोटा बहाणा करून हे आरोपी या गाड्यांची विक्री Two Wheeler Sell करत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस चौकशी दरम्यान समोर आला आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com