Jalna Accident News: दुचाकीला धडक देत भरधाव कार पुलाखाली कोसळली; सात जण गंभीर जखमी

Car Crashes Under a Bridge After Hitting Two Wheeler: दुचाकीला धडक देत भरधाव कार पुलाखाली कोसळली; सात जण गंभीर जखमी
Accident News
Accident NewsSaam tv

जालना : जालना बायपास रोडवरील नवीन मोंढाजवळ असलेल्या पुलावर भरधाव कारने दुचाकीला जोरदार (Accident) धडक दिली. यानंतर अनियंत्रीत असलेली कार पुलाखाली नाल्यात ३० फूट खाली जाऊन (Jalna News) कोसळली. यात कारमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. (Tajya Batmya)

Accident News
Heat Wave: जळगाव, नंदूरबारमध्‍ये तापमानाने गाठला उच्चांक

जालना बायपास रोडवरील पुलावरून आज सकाळी अकराच्‍या सुमारास सदरचा अपघात झाला. भरधाव वेगाने येत असलेली कारने समोरून येत असलेल्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला धडक बसल्‍याने कार चालकाचे नियंत्रण सुटले. यात पुलाचा कढळा तोडून कार ३० फुट खोल नाल्‍यात पडली. या भीषण अपघातामुळे रस्‍त्‍यावरून जात असलेल्‍यांचा हृदयाचा ठोका चुकला होता.

Accident News
Jayant Patil: ईडी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मुदत मागणार; जयंत पाटील

सातजण गंभीर जखमी

कार नाल्‍यात कोसळ्यामुळे झालेल्‍या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. पुलाखाली पडल्‍याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरीकांनी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com