धक्कादायक! 'तुमचे पैसे पडल्याचे' सांगत व्यापाऱ्याचे 9 लाख पळवले

जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील कापूस व्यापाऱ्याला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटले!
धक्कादायक! 'तुमचे पैसे पडल्याचे' सांगत व्यापाऱ्याचे 9 लाख पळवले
धक्कादायक! 'तुमचे पैसे पडल्याचे' सांगत व्यापाऱ्याचे 9 लाख पळवले SaamTvNews

जालना : बदनापूर तालुक्यातील कडारी बुद्रुक येथील कापसाचे व्यापारी जनार्दन चपटे या व्यापाऱ्याने जालन्यातील एच. डी.एफ.सी बँकेतून शेतकऱ्यांना देण्यासाठी 9 लाख रुपये काढले. पैसे घेऊन बदनापूर शहराकडे चपटे हे येत होते. दरम्यान, धोपटेशोर फाट्यावर दुचाकीवरून आलेय दोन अज्ञात आरोपींनी जनार्दन चपटे यांना तुमचे दोन हजार खाली पडल्याचे सांगितले.

हे देखील पहा :

यावेळी चपटे यांनी आपली दुचाकी थांबवली त्याच वेळी या दोन आरोपींनी दुचाकीला लटकवलेली 9 लाखाची बॅग पळवली. हि घटना आज सायंकाळी 7 च्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! 'तुमचे पैसे पडल्याचे' सांगत व्यापाऱ्याचे 9 लाख पळवले
Atharva : धोनीची पहिली ग्राफिक कादंबरी 'अथर्व: द ओरिजिन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

या प्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून बदनापूर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या अज्ञात दुचाकीवरून आलेल्या आरोपींचा तापास पोलिसांकडून केला जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com