जालन्यात दुचाकीचोराला बेड्या, 6 दुचाक्या जप्त

अमोल म्हस्के असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव
जालन्यात दुचाकीचोराला बेड्या, 6 दुचाक्या जप्त
जालन्यात दुचाकीचोराला बेड्या, 6 दुचाक्या जप्तलक्ष्मण सोळुंके

जालना - दुचाकी चोरून त्यांची चोरटी विक्री करणाऱ्या एकाला हसनाबाद पोलिसांनी अटक केली आहे. अमोल म्हस्के असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हसनाबाद परीसरात व तालुक्यात आरोपी  दुचाकी चोरुन त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने दुचाकी चोरून विक्री करत असल्याची कबुली दिली.या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 6 दुचाक्या जप्त केल्या आहे.

हे देखील पहा -

जप्त करण्यात आलेल्या दुचाकी या जालना जिल्ह्यातून चोरण्यात आल्याची कबुली आरोपीनी दिली आहे. या गाड्या फायनान्सच्या असल्याचे सांगत कागदपत्रं नंतर आणून देतो असा बहाणा करून हे आरोपी या गाड्यांची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस चौकशी दरम्यान समोर आला आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत असून या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.