४ कोटींच्या खंडणीसाठी झालं होतं १०वीच्या मुलाचं अपहरण, पाच तासांनंतर...

५ तासात सुटका करण्यात पोलिसांना यश
Jalna Police Station
Jalna Police Stationलक्ष्मण सोळुंके

जालना: जालन्यातून अपहरण झालेल्या दहावीच्या मुलाचं ५ तासात सुटका करण्यात पोलिसांना (police) यश आले आहे. पोद्दार शाळेत (school) परीक्षेला गेला असता हा धक्कादायक प्रकार घडला होता. हे अपहरण (Abduction) तब्बल ४ कोटीच्या खंडणीसाठी (Ransom) करण्यात आले आहे. ५ तासानंतर ड्रायव्हरसह मुलगा पोलिसांच्या (police) ताब्यात आहेत. जालना (Jalna) शहरात एका मेडिकल व्यावसायिकाच्या १० वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाचे अपहरण करून तब्बल ४ कोटीची खंडणी मगितल्याची घटना शहरात घडली आहे.

हे देखील पाहा-

या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने जिल्ह्यात (district) नाकाबंदी करत ५ तासात मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरातील मेडीकील व्यावसायिक महावीर गादिया यांचा १६ वर्षीय मुलगा हा १० वीची परीक्षा देण्यासाठी पोद्दार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला होता. मात्र साडेबारा वाजता परीक्षा संपून तो परत आला नाही, म्हणून पालकांनी ड्राइव्हरच्या मोबाईलवर फोन करण्यात आला होता. परंतु, अज्ञात अपहरण कर्त्यांनी त्यांना मुलगा हवा असल्यास ४ कोटीं रुपये आणून देण्याची मागणी केली होती.

Jalna Police Station
अभिनेत्री हृता दुर्गुळे अडकली विवाहबंधनात; प्रतीक शाहसोबत शेअर केले लग्नाचे खास फोटो

अपहरण कर्त्यांनी त्यांना अंबड चौफुली, त्यानंतर अंबड शहरात बोलावून ते फरार झाले होते. पोलिसांनी जिल्ह्यात मुख्य रस्त्यासह जिल्हाभरात नाकाबंदी करून चालकाचा मोबाईल ट्रेस करण्यात येत होता. परंतु, सतत लोकशेन बदलत असल्याने सर्व तालुक्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. मोबाईल लोकेशनवरून पोलिसांना मुलगा अंबड रोडवरील शहापूरजवळ चालकासह आढळून आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com