Jalna News: सासरवाडीत येऊन जवायाकडून सासऱ्यावर गोळीबार; सासऱ्याचा जागीच मृत्‍यू

सासरवाडीत येऊन जवायाकडून सासऱ्यावर गोळीबार; सासऱ्याचा जागीच मृत्‍यू
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : अंबड शहरातील पाचोड रोड परिसरात कौटुंबिक वादातून जावयाने मित्रांसह दुचाकीवर (Jalna News) सासरवाडीत येऊन सासऱ्यावर गोळीबार (Crime News) केल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेने पंडित भानुदास काळे (वय ६५) यांचा जागीच मृत्‍यू झाला. (Live Marathi News)

Jalna News
Ahmednagar Accident News : देवदर्शनासाठी निघाले; वाटेतच काळाचा घाला, अपघातात ३ जण ठार १२ जखमी

सदर घटनेने अंबड शहरासह परिसरात एकच खबळ उडाली. घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंबड शहरातील पाचोड परिसरात राहणाऱ्या पंडित भानुदास काळे यांचे जवाई किशोर शिवदास पवार (रा. आडूळ, ता. पैठण, हल्ली मुक्काम पाचोड) यांच्यासोबत कौटुंबिक कलहातून अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती समोर आली. या वादातून जवाई किशोर पवार याने आज सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या मित्रांसह सासरवाडीत आले.

Jalna News
Navapur News: जीव धोक्यात टाकून गॅस वाहनात भरण्याचा प्रकार; पोलीसांच्या छाप्यात ४० गॅस सिलिंडर जप्त

दोन गोळ्या लागल्‍याने मृत्‍यू

सासरे पंडित काळे यांच्यावर जवळ असलेल्या गावठी कट्टयातून गोळीबार केला. यात पंडित काळे यांना दोन गोळ्या लागल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक ढाकणे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामाना करत काळे यांचा मृत्यदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय अंबड या ठिकाणी दाखल केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com