Jalna News : पत्नीवर सामूहिक अत्याचारानंतर क्लिप व्हायरल, बदनामीच्या भीतीनं पतीनं उचललं टोकाचं पाऊल

विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर या घटनेच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
Jalna Crime News
Jalna Crime News Saam TV

Jalna Crime News : महाराष्ट्रातील जालना धक्कादायक घटनेनं हादरला आहे. विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर या घटनेच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. आपली समाजात बदनामी होईल या भीतीने पतीनं आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना जालन्यात घडली आहे. जालना (Jalna) येथील एका गावात विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. या घटनेशी संबंधित ऑडिओ क्लिप गावात व्हायरल करण्यात आली. समाजात आपली बदनामी होईल या भीतीनं पीडितेच्या पतीने आत्महत्या केली.

Jalna Crime News
Virar : संतापजनक! तरुणीची हत्या करून मृतदेहावर अत्याचार; आरोपी अटकेत

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील एका गावात ही घृणास्पद घटना घडली आहे. पीडित महिलेने पारध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, या घटनेत तीन पुरुष, तर दोन महिला सहभागी आहेत. यातील दोन आरोपींनी आणि त्यांच्या साथीदार दोन महिलांनी एकाला फोनवर बोलण्यास महिलेला भाग पाडलं. तसेच त्यांनी पीडितेला गुंगीचे ओषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केले. नराधमांनी या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओही (Video) काढला होता.

Jalna Crime News
Jalna News : फरार आरोपीला तमाशाचा मोह पडला महागात; पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

संतापजनक बाब म्हणजे आरोपींनी पीडितेच्या पतीला आणि गावातील इतर व्यक्तींना सेशल मीडियाद्वारे ती ऑडिओ क्लिप पाठवली आणि व्हायरल केली. हा धक्का पीडितेच्या पतीला सहन झाला नाही. त्यामुळे त्याने विषारी औषध पिऊन जीवन संपवले. या घटनेनंतर पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पारध पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com