Video : फारकत घेण्यासाठी आली अन् थेट सासरा आणि नवऱ्याच्या कानशिलात भडकावली, महिलेच्या कृत्यामुळे दोन गटात तुफान राडा

जालन्यात फारकत घेण्यासाठी आलेल्या सुनेने सासरा आणि पतीच्या श्रीमुखात लागवल्याने न्यायालय परिसरात दोन गटात तुंबळ फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
Jalna crime news
Jalna crime news Saam tv

Jalna Crime News : जालन्यात फारकत घेण्यासाठी आलेल्या सुनेने सासरा आणि पतीच्या कानशिलात लागवल्याने न्यायालय परिसरात दोन गटात तुंबळ फिल्मी स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी जालन्यातील भोकरदन शहरातील न्यायालय परिसरात घडली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marthi News)

Jalna crime news
Nashik News : खेळता खेळता लिफ्टच्या खड्ड्यात पडला अन्.., १० वर्षीय चिमुकल्यासोबत घडली दुर्देवी घटना

मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील पोखरी गावातील सुवर्णा सुभाष लुटे हिचा विवाह आडगाव भोंबे येथील शुभम विनायक साळवे या तरुणासोबत झाला होता. मात्र दोघांमध्ये वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे सुवर्णा गेल्या काही दिवसांपासून माहेरी राहत होती. त्यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्हीकडील मंडळीला मान्य नसल्याने दोघांनी फारकत घेण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे दोघे ठरल्याप्रमाणे दोन्ही कडील मंडळी भोकरदन न्यायालयात दाखल झाले. न्यायलयात वकिलांशी झालेल्या चर्चेनंतर नोटरी केली. दरम्यान, ठरल्याप्रमाणे मुलाकडील लोकांनी मुलीला चार लाख रुपये दिले.

सर्व शांतते पार पडत होते. मात्र, त्याचवेळी सुवर्णाने पळत येत सासरे विनायक साळवे यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर शुभम साळवे देखील धावत गेला. त्यावेळी त्याला देखील मारहाण करण्यात आली.

दोन्ही गटातील मंडळी एकमेकांवर फिल्मी स्टाईल तुटून पडल्याने दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही गटावर लाठीचार्ज केला. तसेच वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तरीही भांडण सुरूच होते. अखेर पोलिसांनी दोन्ही गटातील १० ते १२ जणाविरुद्ध जालना (Jalna) भोकरदन पोलीस (Police) ठाण्यात न्यायालय परिसरात गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com