Jalna : खाऊचं आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

४ वर्षाच्या मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं २० वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Crime news
Crime news saam tv

जालना : ४ वर्षाच्या मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या एका आरोपीला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं २० वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विनोद पैठणकर असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीला एक लाखांचा दंड न भरल्यास आणखी ३ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागेल असंही न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केलं आहे. (Jalna Crime News )

Crime news
कॉफीत टाकले गुंगीचे औषध, अश्लील फोटो काढून महिलेकडे शारिरीक सुखाची मागणी, त्यानंतर...

मिळालेल्या माहितीनुसार, कदीम जालना (Jalna) पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली होती. 12 डिसेंबर 2017 रोजी शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी 6 ते 8.30 वाजेच्या दरम्यान सदर घटना घडली. आरोपी विनोद पैठणकर हा 4 वर्षाच्या मुलीला खाऊ देण्याचं आमिष दाखवून मोटारसायकलवरून मुलीचं अपहरण करून तिला मुक्तेश्वर तलाव परीसरात घेऊन गेला. त्यानंतर तिला मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Crime news
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखलं

लैंगिक अत्याचार प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निकाल देत आरोपी विनोद पैठणकर याला २० वर्ष सश्रम कारावास आणि एक लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.आरोपीने एक लाखांचा दंड न भरल्यास आणखी ३ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागेल असंही न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com