Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam Tv

Crime: धक्कादायक! जालन्यात तृतीयपंथीवर बलात्कार; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली

जालना - एका ३० वर्षीय तृतीयपंथीवर बलात्कार केल्याची घटना शहराजवळील मंठा बायपास रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली आहे. या घटनेमुळे जालना (Jalna) शहरात एकच खळबळ उडाली आहे. संशयित तृतीयपंथी ही शुक्रवारी सकाळी पीडितेकडे आली. तुमच्या शिष्यला काही लोकांनी मंठा बायपासवरील उड्डाणपुलाखाली पकडून ठेवले आहे. तुम्ही गुरूला बोलावून आण, तेव्हा मी तुझ्या शिष्याला सोडते, असे ते म्हणत असल्याचे सांगत आरोपी पीडितेला स्कुटीवर बसून उड्डाणपुलाखाली घेऊन गेली.

हे देखील पाहा -

तेथे संशयित आसेफ शेख व फाद शेख हे दोघे बसले होते. त्यावेळी तृतीयपंथी व्यक्तीने पीडितेला दोन्ही आरोपींच्या अंगावर लोटले. त्यानंतर आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला. त्यानंतर तिघे त्या ठिकाणाहून पळून गेले. त्यानंतर पीडितेने घटनेची माहिती कदीम पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Jalna Crime News
Moong Dal Khichdi Recipe: पावसाळ्यात मूग डाळ खिचडी खा, त्याचे फायदे आणि रेसिपी जाणून घ्या

या प्रकरणी पीडित तृतीयपंथ्याच्या तक्रारी वरून कदीम जालना पोलीस ठाण्यात तिघा जाणा विरुद्ध बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दोन आरोपीना पोलीसांनी दोन तासात अटक केली असून एक आरोपी फरार असल्याने पोलिसांनी शोध सुरू आहे. या प्रकरणी पीडित तृतीयपंथ्याच्या तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com