Gram Panchayat Elections 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीत 'या' बड्या नेत्यांची प्रतिष्ठापणास; उद्या मतदान

उद्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान हाेणार आहे.
Gram Panchayat Election 2022, Jalna
Gram Panchayat Election 2022, JalnaSaam tv

Jalna Gram Panchayat Elections 2022 : जालना जिल्ह्यात सध्या २६६ ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा धुरळा अंतिम टप्प्यात पोचला आहे. उद्या (रविवार) सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याने आज प्रशासनच्या वतीने जय्यत तयारीला सुरवात झाली आहे. (Maharashtra News)

जिल्ह्यातील सर्व बूथवर मतदानासाठीचे ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्याच्या वाटपासाठी सुरवात झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर नागरिकांना आपल्या मतदानाचा (voting) हक्क बजावता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी अंतिम टप्यात आली आहे.

Gram Panchayat Election 2022, Jalna
Gram Panchayat Elections 2022 : 'दबाव, दहशत सहन केली जाणार नाही'

जिल्ह्यातील २६६ पैकी १६ ग्रामपंचायती वर १६ सरपंचाची बिनविरोध निवड झाली आहे. तर ३३३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अत्ता २६६ पैकी २५३ ग्रामपंचायतीच्या १ हजार ८२६ सदस्य आणि २५० सरपंचपदासाठी होणाऱ्या निवडणुकीचे (election 2022) मतदान उद्या सकाळी सात वाजल्या पासून सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनच्या व पोलिस प्रशासनच्या वतीने या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे.

Gram Panchayat Election 2022, Jalna
Gram Panchayat Elections 2022 : सरपंचपदासाठी रस्सीखेच, जावळीत राडा; पाच अटकेत

दरम्यान जिल्ह्यात भोकरदन- जाफ्राबाद तालुक्यात दोन्ही दानवे यांच्यात संघर्ष पेटला आहे. तर घनसावंगी तालुक्यात राजेश टोपे विरुद्ध सतीश घाडगे असा संघर्ष बघायला मिळत आहे. जालना तालुक्यात खोतकर विरुद्ध गोरंट्याल असा तर बदनापूर तालुक्यात आमदार नारायण कुचे विरुद्ध माजी आमदार संतोष सांबरे असा संघर्ष पहायला मिळत आहे.

Gram Panchayat Election 2022, Jalna
Gram Panchayat Elections 2022 : चर्चा तर हाेणारच ! 'ग्रामपंचायती' त काॅंग्रेसचे बच्चू कडूंपुढे आव्हान

परतूर आणि मंठा तालुक्यात आमदार लोणीकर विरुद्ध माजी आमदार जेथलीया असा संघर्ष या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या बड्या नेत्यांनी कंबर कसली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com