आयकरच्या धाडीत ३९० कोटींची माया जप्त; जालन्यातील उद्योगपतीची चाैकशी सुरुच

३ ऑगस्ट रोजी, आयटीने जालन्यातील एका उद्योगपतीशी संबंधित विविध ठिकाणी शोध घेतला आहे.
Jalna Income Tax Raid News
Jalna Income Tax Raid NewsSaam Tv

जालना: आयकर विभागाने जालना (Jalana) येथील एका उद्योगपतीची ३९० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ३ ऑगस्ट रोजी, आयटीने जालन्यातील एका उद्योगपतीशी संबंधित विविध ठिकाणी शोध घेतला आहे. आयकर (Income Tax) विभागाने एकूण ३९० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ५८ कोटींची बेहिशेबी रोकड, ३२ किलो सोने जप्त केली आहे. सुमारे ३०० आयकर अधिकाऱ्यांनी जालन्यात अनेक ठिकाणी छापा टाकला आहे.

राज्यात सर्वाधिक लोखंडी गज उत्पादित करणाऱ्या जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यावर आणि घरांवर तसेच कार्यालयांवर प्राप्तिकर छापा टाकला आहे. या छाप्यात सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली आहे. त्यात ५८ कोटींची रोकड, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिरे, मोती असा १६ कोटींचा ऐवज तसेच सुमारे ३०० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेच्या कागदपत्रांसह महत्त्वाचा दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे.

Jalna Income Tax Raid News
Raksha Bandhan 2022: वृक्षवल्ली आम्हा सोयरे... चिमुकल्यांनी झाडांना राखी बांधून साजरी केली रक्षाबंधन

प्रख्यात लँड डेव्हलपर व व्यापाऱ्याचाही समावेश

यात औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर व व्यापाऱ्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे ही रोकड मोजण्यासाठी पथकाला तब्बल १३ तास लागले. १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकारी-कर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात पोहोचले होते.

आयकर विभागाच्या नाशिक (Nashik) अन्वेषण व शोध विभागांतर्गत औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील चार स्टील कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. यातून प्राप्तिकर बुडवल्याचा संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात १ ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनांतून जाऊन स्टील कारखानदारांवर व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी छापे टाकले.

हे देखील पाहा

Jalna Income Tax Raid News
केदार दिघेंना मुंबई सत्र न्यायालयाने केला अटकपूर्व जामीन मंजूर

एकाचवेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी केली कारवाई

एकाचवेळी वेगवेगळ्या पाच पथकांनी ही कारवाई केली. त्यात सुरुवातीला काहीच हाती लागले नाही. त्यामुळे या पथकांनी त्यांच्या शहराबाहेरील आठ ते दहा किलोमीटरवरील फार्म हाऊसकडे मोर्चा वळवला. तेथे कपाटाखाली बिछान्यांमध्ये तसेच अडगळीतील काही पिशव्यांत रोकडड सापडली. सर्वत्र नोटांची बंडलेच बंडले आढळली आहेत. आणखी एका व्यावसायिकाच्या घरीही अशीच रक्कम सापडली आहे.

औरंगाबादेतही दोन व्यावसायिकांवर छापे टाकले आहेत. यात ५८ कोटी रोख तसेच १६ कोटींचे सोन्याचे दागिने, हिरे, ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता सपाडल्या आहेत. ही रोकड मोजण्यासाठी १३ तास लागले आहेत. जालन्यात मिळालेली रोकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली आहे.

जमिनी, शेती, बंगल्याची बँकेतील कागदपत्रे जप्त करण्यात आले आहेत. जालन्याच्या या चारही स्टील व्यावसायिकांपैकी तिघांकडे रोख रकमेसह सोन्याचे दागिने बिस्किटे, विटा, नाणी, हिरे मिळाले आहेत. सोन्याच्या ३२ किलो दागिन्यांची बाजारभावानुसार किंमत १६ कोटी रुपये आहे. या व्यापाऱ्यांची घरे, कार्यालयांतून वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनी, शेती, बंगले यासह बँकांतील ठेवी व इतर व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. एकूण सुमारे ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा दावा पथकाने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com