मायलेकीच्या खून प्रकरणातील आरोपीचा जिल्हा कारागृहात मृत्यू; इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी

पोलिसांची औरंगाबाद शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी....
Jalna News
Jalna NewsSaam Tv

जालना - जुना जालना (Jalna) भागातील सोनलनगर परिसरात गेल्या महिन्यात मायलेकीची हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणाती मुख्य आरोपी असलेल्या गणेश सतारे या आरोपीचा जिल्हा कारागृहात असताना चक्कर येवून कोसळल्याने मृत्यू झाल्याची घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खबळ उडाली आहे .जालना भागातील सोनलनगर परिसरात १६ मे ला चरित्याच्या संशयावरून भारती सतारे व वर्षा सतारे या माय - लेकीचा हत्या करण्यात आली होती.

हे देखील पाहा -

या हत्या प्रकरणी पोलिसांनी पती गणेश सातारे, सवत व तिच्या मुलाविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.पोलिसांनी त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी गणेश हा ब्रश करत असताना त्यांच्या छातीत कळ आल्याने तो चक्कर येऊन कोलसल्याची बाब लक्षात येताच कारागृह पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने एकाच खबळ उडाली आहे.

Jalna News
ठाकरेंच्या विराेधातील शक्ती प्रदर्शनसाठी सिल्लाेडला अब्दुल सत्तारांची जय्यत तयारी सुरु

दरम्यान या प्रकरणी तालुका पोलिसांनी गणेश सातारे यांचे औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केल्याने जिल्हा कारागृह प्रशासनावर प्रश्न उपस्तीत केल्या जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com