ATM Crime: एटीएममधून पैसे काढताना वापरायचा नामी शक्‍कल; खात्यातून डेबिट न होता निघायची रक्‍कम

एटीएममधून पैसे काढताना वापरायचा नामी शक्‍कल; खात्यातून डेबिट न होता निघायची रक्‍कम
ATM Crime
ATM CrimeSaam tv

जालना : जालन्यात एकाने नामी शक्‍कल लढवून बँकेची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बँकेच्या (Bank) कर्मचाऱ्याना पकडण्यात यश आले. बँक कर्मचाऱ्यांना त्याला एटीएम (ATM) मशीनमधून नामी शक्‍कल लढवून पैसे काढताना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना जालन्यात घडली. या भामट्याची ही नामी शक्‍कल पाहून बँक कर्मचाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. (Breaking Marathi News)

जालना शहरातील रेल्वेस्थानक रोड ते ममादेवी चौक परिसरातील दीनदयाळ नागरी सहकारी बँक म. अंबाजोगाई या शाखेच्या एटीएम मशीनमधून गेल्या काही दिवसात पैसे गायब होत असल्याचा प्रकार घडत होता. एटीएम मशीन मधून अज्ञात व्यक्ती आपले कार्ड टाकून पैसे काढत होता. मात्र पैसे निघाल्यानंतर बँकेच्या कुठल्याच खातेदाराच्या खात्यातून ही रक्कम डेबिट होत नसल्याने त्यांचा भुर्दंड बँक कर्मचऱ्याना बसत असल्याने कर्मचारी चक्रावून जात होते.

ATM Crime
Aurangabad News: एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल

अन्‌ तो सीसीटीव्‍हीमध्‍ये दिसला

शनिवारी बँकेतील कर्मचारी याचं विषयावर चर्चा करत होते. या दरम्‍यान एक अज्ञात तरुण बँकेच्या एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकल्यानंतर एटीएम मशीनला काही तरी लावत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निरदर्शनास आले. यानंतर (Jalna) बँक कर्मचाऱ्यांनी बँकेच्या बाहेर धाव घेत एटीएमचा शटर बाहेरून बंद करत पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिती मिळताच कदीम जालना पोलिसांच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एटीएममधून या तरुणाला ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एटीएम कार्ड (ATM Card) आणि एटीएम मशीनची चावी ताब्यात घेतली आहे.

अशी करायचा चोरी

सदरचा तरुण पैसे काढण्याच्या बहाण्याने एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकल्यानंतर पासवर्ड टाकून ठराविक रक्कम टाकत होता. त्याचं दरम्यान हा तरुण एटीएम मशीनच्या लॉकमध्ये चाबी फसवून रक्कम काढून घेत होता. एटीएम मशीनमध्ये चावी टाकल्यानंतर हे मशीन स्विच बंद करून तो मधीन हँग करत असल्‍याने त्यांच्या खात्यातून ही रक्कम डेबिट होत नव्‍हती. ही रक्कम मशीनमधून गायब होत कमी भरत असल्याने यांचा भुर्दंड कर्मचऱ्याना सोसावा लागत होता. त्यांच्या या नामी शक्‍कलंमुळे बँक कर्मचाऱ्यांसह पोलिसही चक्रावून गेले.

आरोपी ताब्‍यात

दरम्यान कदीम जालना पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून हा आरोपी अनुजकुमार सुशीलकुमार साहू (वय २०, रा. नर्वल, जि. कानपूर उत्तर प्रदेश) याला अटक केली असून त्यांच्या विरुद्ध 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकरणी अधिक तपास कदीम जालना पोलिस करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com