Mahila Bachat Gats चे ११ लाख रुपये घेऊन Cashier चा पाेबारा; पाेलीस तपास सुरु

पाेलीसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे.
jalna, crime news
jalna, crime newssaam tv

Jalna Crime News : जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या भारत फायनान्स शाखेचा कॅशियर ११ लाख रुपये घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. तो महिला बचत गटाची रक्कम बॅंकेत जमा करण्यासाठी गेला अन् परतलाच नाही. त्यामुळे त्याच्या विराेधात शाखा व्यवस्थापकाने पाेलीसांत लेखी स्वरुपात तक्रार नाेंदवली आहे. (Maharashtra News)

jalna, crime news
Maharashtra News : निर्णय झाला, वितरण कधी ? शालेय विद्यार्थ्यांसाठी एक रंग - एक गणवेश

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार सुधाकर यादव -अपुलवार (राहणार बितमाळ, ता. उमरी, जिल्हा नांदेड) भोकरदन (bhokardan) येथील भारत फायनान्स शाखेत कॅशियर म्हणून कार्यरत आहे. ताे संस्थेचे ११ लाख घेऊन पसार झाल्याची तक्रार शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी दिली आहे.

जाधव यांनी नेहमीप्रमाणे बचत गटाची जमा असलेली रक्कम सुधाकर याला देत तू बँकेत जावून जमा कर असे सांगितले हाेते. ११ लाख ५१ हजार ५६० रुपये इतके हाेते. लोनसाठी कोणी सभासद आल्यास त्यांना कर्जाचे वाटप करा व शिल्लक पैसे बँकेत जामा करा असेही सुधाकरला जाधव यांनी सांगितले हाेते.

jalna, crime news
Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

त्यानंतर जाधव हे वसुलीसाठी भोकरदन तालुक्यातील वालसावंगी या गावाला गेले. दुपारनंतर सुधाकर याला त्यांनी वारंवार कॉल करूनही त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे शाखा व्यवस्थापक यांनी भोकरदन शहर गाठले. सुधाकर याचा शोध घेतला. तसेच बँकेत जाऊन विचारणा केली असता तो कॅश जमा करण्यासाठी आलाच नसल्याची माहिती समोर आली.

jalna, crime news
Manmad Krushi Utpanna Bazar Samiti News : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवड बिनविराेध; NCP कडे सभापतीपद, ठाकरे गटास उपसभापतीपद

त्यानंतर जाधव यांनी थेट भोकरदन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना माहिती देऊन सुधाकर यादव याच्या विराेधात लेखी तक्रार दिली. या प्रकारणी भोकरदन पोलिसांनी सुधाकर यादव- अपुलवार याचा शोध सुरु केला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com