Jalna News: शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवला एक किलो कापूस; चुकीच्या आयात, निर्यात धोरणाचा निषेध

शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवला एक किलो कापूस; चुकीच्या आयात, निर्यात धोरणाचा निषेध
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याला (Farmer) मोठा तोटा सहन करावा लागतं आहे. त्यामुळे आधीच मेटकुतीला आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मरावं की जगावं असा प्रश्न निर्माण झाला असताना सुद्धा सरकार कापसाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात असमर्थ झाल्याने (Jalna News) जालन्‍यातील संतप्त झालेल्या शेतकरी आणि संघटनाकडून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आज कापूस गाठ भेट म्हणून पाठवण्यात आली आहे. (Breaking Marathi News)

Jalna News
Beed News: भूक भागवा म्हणत चालकानेच काढली महिलेची छेड; धावत्या बसमधील धक्‍कादायक प्रकार

राज्यासह जिल्ह्यातील आधीच अतिवृष्टी आणि अवकाळी मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत करून (Cotton) कापूस, सोयाबीन, कांदा इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात पिकवली. ज्यावेळेस ही पीक निघाली; त्यावेळेस मात्र सरकाराच्या आयात आणि निर्यात धोरणाचा मोठा फटका बसला. यामुळे शेतकऱ्याला गतवर्षीच्या तुलनेत कमीच भाव या पिकांना मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन हे घरात साठवून ठेवची वेळ शेतकऱ्यावर ओढवली.

Jalna News
Chalisgaon News: आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी बसविले; काळजी घ्या म्‍हणत रेल्वेतून उतरताना मुलाचा मृत्यू

कृषी विभागाकडून व इतर काढलेला माल टप्प्याटप्प्याने विकावा, म्हणून शेतकऱ्यांना तसे मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांनीही माल घरातच ठेवला. त्यातच केंद्र सरकारच्या चुकीचे धोरण आखत कापसाच्या गाठी आणि तेलाची आयात केल्याने शेतकऱ्यावर ही वेळ ओढवली असल्याचा आरोप करत जालन्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच आयात आणि निर्यात धोरणाचा निषेध केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक किलो (Cotton Price) कापूस भेट म्हणून पाठवला आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटाला केंद्र आणि राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ही यावेळी शेतकऱ्यांनी केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com