Gautami Patil: विकृत डान्‍सवर आवर घाला; मनसेची पोलिसात तक्रार

विकृत डान्‍सवर आवर घाला; मनसेची पोलिसात तक्रार
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : अभिनेत्री गौतमी पाटील हिच्या विकृत डान्सवर आवर घाला; अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील. मनसेकडून अशी तक्रार (Jalna) जालन्यातील सेवली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. गौतमी पाटील हिच्या अश्लिल हावभावामुळे समाजातील वातावरण दूषित झाल्याचा आरोप देखील (MNS) मनसेने केला आहे. (Tajya Batmya)

Jalna News
Wardha News: तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याविना मी राहू शकत नाही..पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या नावे निनावी पत्राने खळबळ

अभिनेत्री गौतमी पाटील हिच्या विकृत डान्सवर आवर घाला, अन्यथा गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील; असा इशारा देत जालन्यातल्या सेवली पोलिसात (Police) मनसेने तक्रार दाखल केली. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे अनेक कलाकार संस्कृती जपून आपला डान्स सादर करत असतात. मात्र अभिनेत्री गौतमी पाटील ही हेतू पुरस्कर अश्लिल हावभाव दाखवत डान्स करत आहे. त्यामुळे समाजातील वातावरण दूषित होत चालले आहे.

गौतमी पाटील हिच्या विकृत चाळे आणि अश्लिल हावभाव असणाऱ्या डान्सवर आवर घाला. अशी तक्रार मनसेने जालना जिल्ह्यातल्या सेवली पोलिसात दिली. अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील असा थेट इशाराच मनसेच्या सिद्धेश्वर जनार्धन काकडे या तरुण मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना तक्रार देऊन दिला आहे. यावर आता पोलीस काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com