Jalna News: राज्यपाल आहे तोपर्यंत अधिवेशन होवू देणार नाही; आमदार कैलास गोरंट्याल यांचा इशारा

राज्यपाल आहे तोपर्यंत अधिवेशन होवू देणार नाही; आमदार कैलास गोरंट्याल यांचा इशारा
Kailas Gorantyal
Kailas GorantyalSaam tv

जालना : राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. यात आता अधिवेशात देखील त्‍याचे पडसाद उमटू शकतात. त्‍यानुसारच राज्यपाल आहे, तोपर्यंत अधिवेशन होवू देणार नसल्याचा आक्रमक इशारा (Jalna) जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे. (Maharashtra News)

Kailas Gorantyal
Jalna News: रब्बीत वीजपुरवठा तोडल्याने शेतकरी आक्रमक; महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र त्यांच्यावर कोणतीही (Jalna News) कारवाई झाली नाही. आगामी राज्याचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहे; तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना आवर घालावा

राज्‍यातील काही मंत्र्यांकडून बेताल वक्‍तव्‍य केली जात आहे. यावर बोलताना आमदार गोरंट्याल यांनी आपली बाजून मांडताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बेताल मंत्री आणि प्रवक्त्यांना आवर घालावा; असेही गोरंट्याल यांनी म्हटले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com