Jalna News: जालन्यात २५ लाखाचा गुटखा जप्त; फार्म हाऊसवर धाड टाकत कारवाई

जालन्यात २५ लाखाचा गुटखा जप्त; फार्म हाऊसवर धाड टाकत कारवाई
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : जालना शहराजवळ असलेल्या वखारी वडगाव शिवरात एका व्यापाऱ्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी (Police) विविध कंपन्याचा ब्रँड असलेल्या गुटखा जप्‍त केला आहे. (Breaking Marathi News)

Jalna News
Pachora News; धक्‍कादायक.. पाच महिन्याचे बाळ पोटाला बांधून विवाहितेची विहिरीत उडी; दोन दिवसांपासून होते बेपत्‍ता

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री सुरु असल्याने कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्यांची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरात गुटखा विक्रीसाठी शहरापासून जवळ असलेल्या वखारी वडगाव शिवारात एका व्यापाऱ्याचा फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Jalna News
Child Marriage: ३० दिवसात रोखले तब्बल ३७ बालविवाह; बीड जिल्ह्यात मे महिन्यात प्रशासनाकडून काम

२५ लाखाचा माल जप्‍त

मिळालेल्‍या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करत गुटखा जप्त केला आहे. गुटख्‍याने भरलेल्या गोण्यांसह २५ लाखाचा माल जप्त केला आहे. अन्न व भेसळ प्रशासनाच्यावतीने मालाची तपासणी केली जात असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com