Jalna News: मॉर्निंग वॉक दरम्‍यान हृदयविकाराचा झटका; पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

मॉर्निंग वॉक दरम्‍यान हृदयविकाराचा झटका; पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : थंडी वाढल्‍याने मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्‍या वाढली आहे. यात मॉर्निंग वॉकला गेले असतानाच हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आला. यात जालन्‍यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना आज सकाळी घडली. (Tajya Batmya)

Jalna News
Accident News: अमळनेर बीडीओंचा अपघातात मृत्‍यू; अमळनेर – धुळे मार्गावर कारचा अपघात

पोलीस उपनिरीक्षक सय्यद अहमद सय्यद जमील (मामु) असे मृत्यु झालेल्या (Police) पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते 55 वर्षाचे होते. जालना (Jalna) शहरातील चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये ते सध्या कार्यरत होते. पोलिस उपनिरीक्षक सय्यद अहमद हे रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जात होते. त्‍यानुसार आज देखील सकाळी रेल्वे मैदानावर मॉर्निंग वॉकला गेले होते.

जागीच झाला मृत्‍यू

मॉर्निग वॉक करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांची जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्युमुळे चंदणझिरा पोलिस ठाणे परिसरात शोककळा पसरली असून परतूर तालुक्यातील रेवलगाव या मूळ गावी त्यांचा अंत्यविधी होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com