Jalna News: राज्य महामार्गवरील हॉटेलात सुरु होता कुंटणखाना; पोलिसांची धाड, दोन परप्रांतीय महिलांची सुटका

राज्य महामार्गवरील हॉटेलात सुरु होता कुंटणखाना; पोलिसांची धाड, दोन परप्रांतीय महिलांची सुटका
Jalna News
Jalna NewsSaam tv

जालना : जालना- औरंगाबाद महामार्गांवरील बदनापूर शहरापासून जवळ असलेल्या दूधवाडी फाट्याजवळ (Jalna News) असलेल्या हॉटेलात कुंटणखाना सुरु होता. याबाबत पोलिसांना (Police) मिळालेल्या माहितीवरून बनावट ग्राहक पाठवून अवैधरित्या चालणाऱ्या कुटणंखाण्याचा पर्दाफास करत अँटी आणि एजन्टच्या तावडीतून दोन परप्रांतीय महिलांची सुटका केली. (Latest Marathi News)

Jalna News
Ahmednagar News: ठरलेले लग्न मोडले.. ३२ वर्षीय तरुणाने संपवले आयुष्य; व्हिडीओ करत केला धक्कादायक खुलासा

जालना- संभाजीनगर महामार्गावरील दूधवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल शिवलालवर गेल्या अनेक दिवसापासून कुटणंखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या ग्राहकांनी पोलिसांना इशारा करताच बदनापूर पोलिसांनी हॉटेल धाड टाकली. यानंतर एका अँटीसह एजन्टची कसून चौकशी केली असता त्यांनी हॉटेलच्या रूम मध्ये देहविक्री करण्यासाठी दोन परप्रांतीय महिला आणल्या असल्याची माहिती पोलिसांनी (Police Raid) दिली. नंतर पोलिसांनी या दोन महिलांची सुटका करत अँटी निशा अरुण शेंद्रे व रफीक रऊफ शेख यांच्यावर बाबासाहेब खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुदाम भागवत हे करीत आहेत.

Jalna News
Ahmednagar Crime News: चित्रपटाला शोभेल असा थरार.. पाठलाग करत पोलिसांनी पकडले दरोडेखोरांना


शैक्षणिक परिसर असल्याने विद्यार्थ्यावर होतो परिणाम
दरम्यान बदनापूर ते गेवराई फाट्या दरम्यान असलेल्या दोन किलोमीटर परिसरात मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, फार्मशी कॉलेज तसेच अनेक शैक्षणिक संस्था असल्याने मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी या परिसरात वास्तव्यास आहेत. या अवैधरित्या चालणाऱ्या कुटणंखाण्याचा मोठा परिणाम विद्यार्थ्यावर होत असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसापासून परिसरातील नागरिकांकडून केल्या जात होत्या. बदनापूर शहरापासून पाच किलोमीटर या परिसरात विद्यार्थीचा मोठा वापर असतो त्यांतच परिसराती अनेक हॉटेल मध्ये हा व्यवसाय सुरु असल्याने नागरिकडून चित्ता व्यक्त केल्या जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com