Jalna Crime News: लग्‍नास नकार दिल्‍याने इंस्टाग्राम अकाउंट केले हॅक; तरुणीचे फोटो केले व्हायरल

लग्‍नास नकार दिल्‍याने इंस्टाग्राम अकाउंट केले हॅक; तरुणीचे फोटो केले व्हायरल
Jalna Crime News
Jalna Crime NewsSaam tv

जालना : शहरातील एका तरुणीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल केले. असे करणाऱ्या एका तरुणाला कदीम जालना पोलिसांनी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वैजापूर शहरातून ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध कदीम जालना पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Jalna Crime News
Wardha News: विद्यार्थिनीशी अश्लील चाळे; त्‍या गुरुजीविरुद्ध दोन वर्षांनी गुन्हा दाखल

शहरातील (Jalna News) आनंदनगर भागात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीची इंस्टाग्रामवर मोनू त्रिभुवन नावाच्या तरुणासोबत ओळख झाली होती. या ओळखीनंतर दोघात मैत्री झाली. त्यामुळे दोघे शहरातील एका कॉफी हाऊसवर अधून मधून भेटत होते. हा तरुण अनेक वेळा तरुणीच्या घरीही जाऊन आला होता.

लग्‍नास नकार दिल्‍याने केला प्रकार

काही दिवसांपूर्वी मोनू त्रिभुवन या तरुणाने सदर तरुणीच्या आई– वडिलांची भेट घेवून माझे तुमच्या मुलीवर प्रेम आहे. आम्ही लग्न करणार आहे, असे सांगितले होते. यावेळी सदर तरुणीच्या आईवडिलांनी नकार देऊन विरोध केला. त्यामुळे या तरुणाने तरुणीचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून तरुणीची बदनामी होईल; या उद्देशाने अश्लील फोटो व्हायलर करून बदनामी केली.

गुन्‍हा दाखल

सदरची बाब तरुणीच्या लक्षात येताच तिने आई– वडिलांना सांगितले. त्यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मोनू बाबासाहेब त्रिभुवन (रा. रोटेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) या तरुणाला वैजापूर शहरातून ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्याअन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com