Manoj Jarange Patil News: जरांगे पाटलांना केले रुग्णालयात रवाना; अवयवांवरील परिणामांची होणार तपासणी

Jalna News : जरांगे पाटलांना केले रुग्णालयात रवाना; अवयवांवरील परिणामांची होणार तपासणी
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam tv

जालना : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यात जालना येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) सुरु असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आता साखळी उपोषण सुरु आहे. परंतु या उपोषणादरम्यान (Jalna) त्यांच्या अवयवांवर काही परिणाम झाला आहे का? हे तपासण्यासाठी त्यांना रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Manoj Jarange Patil
Car Accident: १०० फूट खोल दरीत कोसळली कार; चौघांचा मृत्यू, पर्यटनाला जाताना अपघात

मराठा आरक्षणासाठी आंदोलन नव्याने उभारण्यात आले आहे. यात जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये  मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. शासन जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे ना घेण्यावर जरांगे पाटील ठाम होते. सतरा दिवस मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणासाठी उपोषण केले. १७ व्या दिवशी उपोषण मागे घेतले. परंतु गावात साखळी उपोषण सुरूच ठेवले आहे. 

Manoj Jarange Patil
Dhule News : कारागृहात कैद्यांनी साकारल्या बाप्पाच्या सुरेख मूर्ती

शरीराच्या होणार सर्व चाचण्या 

अंतरवाली सराटी गावात साखळी उपोषण करत असून या उपोषणा दरम्यान शरीरावरील अवयवावर झालेल्या परिणामांची तपासणी करण्यासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सर्व चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चाचण्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com