
जालना : प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला इथं सुविधा नसल्याचे सांगत डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. महिलेला जिल्हा (Hospital) रुग्णालयात नेत (Jalna News) असतानाच रस्त्यावर असह्य वेदना सुरू झाल्या. यामुळे सदर महिलेची प्रसुती रुग्णवाहिकेतच झाली. (Live Marathi News)
गरोदर महिलेला प्रसुतीसाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वेदना सुरू झाल्याने रुग्णवाहिकेतील डॉ. देशमुख व चालक गोरे यांनी रुग्णवाहिका परतूर- जालना महामार्गावरील विरेंगाव टोल नाक्यावरच थांबून महिलेच्या आईच्या मदतीने यशस्वी आणि सुरक्षित प्रसूती केल्याची घटना घडली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. शीतल शेजुळ असे या महिलेचे नाव असून ती पुण्याहून परतूर या ठिकाणी माहेरी आली होती.
सुविधा द्याव्यात
परतूर येथील तालुका शासकीय रुग्णालयात कुठल्याच सुविधा नसल्याचं कारण देत महिलेला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान तालुक्याच ठिकाण असताना ही परतूर तालुका आरोग्य केंद्रात कुठल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णालय रेफर रुग्णालय झाल्याने या ठिकाणी आरोग्य विभागाने तात्काळ सुविधा निर्माण कराव्या; अशी मागणी नागरिकांनी केली. तर रुग्णवाहिकेतील (Ambulance) डॉक्टरांनी वेळीच रुग्णवाहिका थांबवून चालकाच्या मदतीने यशस्वी प्रसूती करून महिला आणि बाळावर योग्य ते उपचार केल्याने बाळ आणि आई सुखरुप असल्याची भावना महिलेचे वडील सुभाष अंभिरे यांनी व्यक्त केली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.