
Jalna News: जालना जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून उडी घेऊन कैदी फरार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून कारागृह कर्मचारी रामअप्पा परळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालण्यात जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून उडी घेऊन कैदी फरार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. तुळशीराम मुरलीधर काळे बाजार गल्ली आष्टी असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कारागृहाच्या कारखाना विभागातील 18 कैद्यांना स्वयंपाकगृहाच्या विभागात कारागृह शिपाई रामआप्पा परळकर हे घेऊन गेले होते. त्यावेळी स्वयंपाकगृहाच्या कर्मचाऱ्यांनी कैद्यांची मोजणी केली असता एक कैदी कमी आढळून आल्याने कारागृह कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली.
यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांना कारागृहाच्या भिंतीवर चादर आणि कांबळ एकमेकाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर काळे यांनी चादर आणि कांबळीच्या साह्याने कारागृहाची 33 फूट उंच भिंत पार करून फरार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.
याबाबत कारागृह कर्मचारी रामअप्पा परळकर यांनी दिलेल्या तक्रारी वरून तालुका जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार आरोपी कैदी तुळशीराम काळे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या 224 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.