Jalna: रेल्वे ट्रॅकवरील सेफ्टी प्लेट चोरणारी टोळी जाळ्यात

रेल्वे ट्रॅकवरील सेफ्टी प्लेट चोरणारी टोळी जाळ्यात
Jalna Railway Police
Jalna Railway PoliceSaam Tv

जालना : जालना ते बदनापूर रेल्वे मार्गावर गेल्या दोन महिन्यापासूम मोठ्या प्रमाणावर रेल्वे ट्रॅकवरील सेफ्टी प्लेटच्या (Jalna) चोरीच्या घटना वाढल्या होत्या. रेल्वे ट्रॅकवरील सेफ्टी प्लेट चोरणारा टोळी रेल्वे पोलिसांच्या (Railway Police) जाळ्यात अडकली आहे. (Jalna News Railway Police Action)

Jalna Railway Police
Jalgaon: करंजी बुद्रुक येथे निसर्गाचा प्रकोप; ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे कुटुंब रस्त्यावर

दोन महिन्यांपासून प्लेट चोरी होत होत्या. त्यामुळे रेल्वे रुळावरून घसरून मोठा अपघात (Accident) होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून या मार्गावरील रेल्वे (Railway) गाड्यांची स्पीड लिमिट कमी करावी लागत होती. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील गाड्याच्या वेळापत्रकात रेल्वे प्रशासनाला वारंवार बदल करावा लागत होता. जालना- बदनापूर रेल्वे मार्गावर ही टोळी सक्रिय होती. थेट ट्रॅकवरून सेफ्टी प्लेट आणि रेल्वेच्या साहित्याची ही टोळी करत होती.

चोरी करतानाच पकडले

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे गेल्या पाच दिवसांपासून रेल्वे पोलिसकडून या परिसरात सापळा लावला गेला होता. यात बुधवारी (४ ऑगस्‍ट) ही टोळी सेफ्टी प्लेटसह साहित्याची चोरी करत असताना रेल्वे पोलिसांनी पाच आरोपीना अटक केली. या आरोपींच्या ताब्यातून रेल्वे रेल्वे ट्रॅकवरील सेफ्टी प्लेटसह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कंपन्‍यांचा सहभाग असल्‍याचा संशय

चौकशी दरम्यान या टोळी मागे तीन ते चार औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचाही सहभाग असल्याचा संशय रेल्वे पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी जालना रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सलमान सय्यद हसन, शेख नदीम शेख नसीर, सलीम खान रशीद खान, शेख सोफियान शेख सिराज, नासेर सांडू शेख (रा. चंदनझिरा, जालना) या सर्व आरोपीना औरंगाबाद येथील रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. रेल्वे न्यायालयाने पाच ही आरोपींना रेल्वे पोलिसांच्या अधिक तपासासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. रेल्वे पोलिसांकडून या मागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविली जात असून औद्योगिक वसाहतीतील त्या कंपन्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com