महावितरणच्या कर्मचाऱ्याने ६० हजार रुपये लाटले? अभियंत्यास घेराव

अभियंता गावात आल्यावर गावक-यांना कळाले महावितरणला पैशांचा भरणा झाला नाही.
महावितरणच्या कर्मचाऱ्याने ६० हजार रुपये लाटले? अभियंत्यास घेराव
vadhona villagers protest against mahavitran employee

जालना : विद्युत बिल (mseb) वसुलीसाठी आलेल्या अभियंत्याला गावक-यांनी घेराव घातल्याचा प्रकार जालना (jalna) जिल्ह्यातल्या वाढोणा गावात घडला आहे. परतूर तालुक्यातील वाढोणा गावात जवळपास ४५ पेक्षा जादा मीटर आहेत. गावकऱ्यांनी वीज बिलापोटी ६० हजार रुपये वरिष्ठ तंत्रज्ञ विजय खंदारे या महावितरणच्या कर्मचाऱ्याला दिले. मात्र त्यांनी महावितरणला भरणा केला नाही. vadhona villagers protest against mahavitran employee

vadhona villagers protest against mahavitran employee
दिग्गजांचा जयंतरावांकडून करेक्ट कार्यक्रम; महाविआ १७, भाजप ६

त्यामुळे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी पुन्हा सहायक अभियंता संदीप जयस्वाल हे गावात आले. त्यांनी थबाकी वसुलीचा तगादा लावला. परिणामी ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांना अभियंता जयस्वाल यांना घेराव घातला.

आधी भरलेल्या पैशांची पावती द्या. मगच वसुलीला या असा जाब विचारला. जयस्वाल यांच्याकडे यावर काहीही उत्तर नसल्याने ते माघारी फिरले. दरम्यान वरिष्ठ तंत्रज्ञ विजय खंदारे यांनी अभियंत्यासह मिळून पैसे खाल्ले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com